प्रतिनिधी :पिंपरी, दि. १९ जून २०२६ : पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा केवळ १९ टक्के शिल्लक असून, मान्सूनच्या विलंबामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यात आज (१९ जून)पासून १५ टक्के कपात करण्यात आली आहे. पुणे पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार ही कपात लागू करण्यात आल्याची माहिती महापालिकेने (Pcmc Water Conservation) दिली.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्याचा मर्यादित पाणीसाठा आणि आगामी काळातील वाढती मागणी लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील पाणीपुरवठ्यात आवश्यक ती कपात करण्यात आल्याचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी (Pcmc Water Conservation)सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. वाहन धुणे, बागांना अतिरिक्त पाणी देणे, नळ विनाकारण सुरू ठेवणे यासारखा पाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येकाने पाणी बचतीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी म्हटले (Pcmc Water Conservation)आहे.
आयुक्तांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन करताना, उपलब्ध पाणीसाठा पुरेशा काळासाठी टिकवून ठेवण्यासाठी पाणी बचत ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही स्पष्ट(Pcmc Water Conservation) केले.
