(पिंपरी, दि. ११ सप्टेंबर २०२६): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी दापोडी येथील निर्माल्यापासून सुगंधी धूप व अगरबत्ती निर्मिती प्रकल्पाची उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी निर्माल्य संकलनापासून धूप व अगरबत्ती निर्मितीपर्यंतची प्रक्रिया जाणून घेतली तसेच प्रकल्पात कार्यरत महिलांशी संवाद (Flower Waste Recycling)साधला.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध धार्मिक स्थळे व परिसरातून दररोज सुमारे ५०० किलो निर्माल्य संकलित केले जाते. त्यावर आवश्यक प्रक्रिया करून त्यापासून सुगंधी धूप व अगरबत्ती तयार केली जाते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि चार महिला बचत गटांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत असून, निर्माल्याचा पुनर्वापर करण्यासोबतच महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली (Flower Waste Recycling)आहे.
पाहणीदरम्यान उपमहापौर बाबर यांनी प्रकल्पातील निर्माल्य प्रक्रिया, उत्पादनाची पद्धत तसेच महिलांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधींची माहिती घेतली. यावेळी सहाय्यक आरोग्य निरीक्षक राजेश भाट, अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक ओंकार शिवरकर, प्रभारी आरोग्य निरीक्षक उमेश जाधव, समाज विकास विभागाच्या समूह संघटिका वैशाली लगडे, योजक संस्थेच्या सिनिअर मॅनेजर सेजल जोशी यांच्यासह प्रकल्पातील महिला उपस्थित (Flower Waste Recycling)होत्या.
“गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. हे निर्माल्य नदी, नाले किंवा इतरत्र टाकल्यास पर्यावरणाची हानी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी निर्माल्य नदीत किंवा इतरत्र न टाकता महानगरपालिकेच्या निर्माल्य संकलन व्यवस्थेच्या माध्यमातून या प्रकल्पाकडे द्यावे. निर्माल्यापासून सुगंधी धूप व अगरबत्ती तयार करून त्याचा पुनर्वापर केला जात आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळत आहे. नागरिकांनी या पर्यावरणपूरक उपक्रमाला सहकार्य (Flower Waste Recycling)करावे.”
– शर्मिला बाबर, उपमहापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

