साठवणीतले गाणे:भाग तिसरा,चिट्ठी ना कोई संदेश…
रसिकजन हो, अदाब…
खरं तर हे गीत विरहगीत आहे… किंवा आपल्या आयुष्यातील एखादं जिवलग, अगदी आपलं माणूस हे जग सोडून गेल्यावर त्याच्या आठवणीत मनातून उमटणारा एक आर्त स्वर (Nostalgia Marathi Blog)आहे.
महान गझलगायक जगजीत सिंग यांनी अनेक नॉन-फिल्मी गझल आणि गीते गायली आहेत, जी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. पण त्यांनी काही चित्रपटांसाठीही पार्श्वगायन केलं आणि त्या प्रत्येक गीताला आपल्या आवाजाने अमरत्व (Nostalgia Marathi Blog)दिलं.
१९९८ साली प्रदर्शित झालेल्या दुश्मन या काजोल आणि संजय दत्त अभिनित चित्रपटातील “चिट्ठी ना कोई संदेश…” हे गीत दर्दी कानसेनांना आजही तितकंच (Nostalgia Marathi Blog)भावतं.
मी संगीतातला, गायनातला जराही अभ्यासू नाही; पण कानसेन नक्की आहे.मला हे गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच प्रचंड भावलं होतं… आणि आजही ते तितकंच आवडतं.आपल्या अगदी जवळचं, जीवापाड प्रिय असलेलं कोणी तरी हे जग सोडून गेलेलं असतं… आणि दुर्दैवाने आपण त्या शेवटच्या क्षणी त्याच्या जवळ (Nostalgia Marathi Blog)नसतो.
मग आठवणींचा पूर येतो…
आणि मनात एकच प्रश्न घुमत राहतो…
“हर वक्त यही है ग़म… उस वक्त कहाँ थे हम…”
काही गाणी फक्त ऐकली जात नाहीत…
ती आयुष्यभर जगली जातात!
भारतीय संगीतसृष्टीने आपल्याला काय दिलं (Nostalgia Marathi Blog)नाही?
शंकर–जयकिशनची सुरांची जादू, लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांचं अफाट संगीतविश्व, आनंद बक्षींचे साधे पण थेट हृदयात पोहोचणारे शब्द, गदीमांचं साहित्य, बाबूजी सुधीर फडके यांचा भावस्पर्शी स्वर, लता दीदींचं दैवी गाणं, रफी, किशोर, मुकेश, मन्ना डे… आणि गझल म्हटलं की ज्यांचं नाव सर्वप्रथम ओठांवर येतं ते म्हणजे जगजीत(Nostalgia Marathi Blog) सिंग.
ही माणसं आपल्या आयुष्यात नसती, तर खरंच आपलं आयुष्य किती कोरडं, किती बेचव आणि किती भावनाशून्य झालं असतं, नाही?
संगीत हे फक्त कानांनी ऐकायचं (Nostalgia Marathi Blog)नसतं…
ते मनाने अनुभवायचं असतं.
काही गाणी आपल्याला आनंद देतात, काही प्रेरणा देतात, काही जुन्या आठवणी जाग्या करतात… आणि काही गाणी अशी असतात की ती आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून(Nostalgia Marathi Blog) जातात.
असं एक गाणं आहे…
“चिट्ठी ना कोई संदेश…”
हे गाणं मी किती वेळा ऐकलं असेल, याची गणती नाही. पण आजही ते सुरू झालं की मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात दडलेला दुःखाचा बांध तुटतो.
जगजीत सिंग यांच्या त्या मखमली आवाजात जेव्हा ते म्हणतात…
“हर वक्त यही है ग़म… उस वक्त कहाँ थे हम…”
तेव्हा हा प्रश्न फक्त गाण्यात राहत नाही…
तो आपल्यालाच विचारला (Nostalgia Marathi Blog)जातो.
खरंच…
त्या वेळी आपण कुठे होतो?
माझे वडील…
माझे दादा…
वडील आणि मुलाचं नातं अनेकदा शब्दांत व्यक्त होत नाही. आमचंही तसंच होतं. फार छान बॉन्डिंग होतं. आयुष्यभर ताठ मानेने जगलेला, तब्येतीची कधी तक्रार नसलेला माणूस… कॅन्सरचं निमित्त झालं आणि अचानक हातातून निसटून (Nostalgia Marathi Blog)गेला.
आजही वाटतं…
आणखी थोडा वेळ त्यांच्यासोबत बसायला हवं होतं.
आणखी थोड्या गप्पा मारायला हव्या होत्या.
आणखी एकदा “दादा” म्हणून हाक मारायला हवी होती.
पण…
वेळ निघून गेल्यावर उरतो तो फक्त पश्चात्ताप.
गोकुळ पवार…
रक्ताचं नातं नव्हतं.
पण काही माणसं रक्तापेक्षाही जवळची असतात.
एक दिवस आधी भेटलो.
खूप गप्पा मारल्या.
हसलो.
उद्याही भेटू, असंच वाटलं.
पण दुसऱ्या दिवशी समजलं…
तो निघून गेला.
त्या दिवसापासून…
“जाते जाते तुमने आवाज़ तो दी होगी…”
ही ओळ ऐकली की मनाचा तुकडा (Nostalgia Marathi Blog)होतो.
गुलाब वाल्हेकर…
मित्र म्हणणंही कमी पडेल.
संकटात सर्वप्रथम धावून येणारा माणूस.
माझ्या आयुष्यातील आधारस्तंभ.
त्या दिवशी संध्याकाळी ७:२८ वाजता फोन आला.
मन अस्वस्थ झालं.
आणि अवघ्या पन्नास मिनिटांनी मेसेज…
“तात्या गेले…”
आजही तो मेसेज डिलीट होत नाही.
कारण काही मेसेज मोबाईलमध्ये नसतात…
ते कायमचे मनावर कोरलेले(Nostalgia Marathi Blog) असतात.
डॉ. अभय दिवाण…
शहरातील प्रसिद्ध सर्जन.
पण माझ्यासाठी ते फक्त डॉक्टर नव्हते.
भाऊ होते.
मित्र होते.
मार्गदर्शक होते.
अनेक वेळा संकटात मी त्यांना फोन करण्याआधीच त्यांचा फोन आलेला (Nostalgia Marathi Blog)असायचा.
असा माणूस…
वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी…
अचानक निघून गेला.
आणि पुन्हा…
“चिट्ठी ना कोई संदेश…”
आणि काल…
मनाला आणखी एक धक्का बसला.
जगजीत सिंग यांचा कट्टर चाहता…
माझा लाडका चाचा…
सनी आनंद.
दोन दिवसांपूर्वीच दवाखान्यात भेटून आलो.
नेहमीसारख्याच गप्पा.
चेष्टा.
हसणं.
“उद्या-परवा घरी जाईन…”
हे त्याचे शब्द अजूनही कानात घुमत आहेत.
आणि दोन दिवसांनी…
तोही गेला.
इतकं सहज…
इतकं अचानक…
माणूस जातो तेव्हा त्याच्यासोबत फक्त त्याचा श्वास जात नाही.
आपल्या आयुष्यातला एक कोपरा कायमचा रिकामा करून(Nostalgia Marathi Blog) जातो.
मला नेहमी वाटतं…
या गाण्याचं अमरत्व केवळ जगजीत सिंग यांच्या आवाजामुळे नाही.
तर आनंद बक्षी यांनी माणसाच्या मनात आयुष्यभर राहणारा एकच प्रश्न त्या गीतात लिहून ठेवला…
“हर वक्त यही है ग़म… उस वक्त कहाँ थे हम?”
हे गाणं म्हणजे मृत्यूबद्दल नाही.
हे गाणं आहे…
न बोललेल्या शब्दांबद्दल.
न झालेल्या भेटींबद्दल.
उद्यावर ढकललेल्या फोनबद्दल.
रुसव्यामुळे न केलेल्या संवादाबद्दल.
आणि शेवटी आयुष्यभर सोबत राहणाऱ्या (Nostalgia Marathi Blog)पश्चात्तापाबद्दल.
१९९८ मध्ये आलेल्या दुश्मन चित्रपटासाठी आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गझलसम्राट जगजीत सिंग यांनी आपल्या अमर आवाजाने सजवलेलं हे गीत प्रत्येक पिढीला रडवत राहील.
कारण…
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा चेहरा असतो…
ज्याला आपण पुन्हा एकदा भेटू इच्छितो.
एकदा मिठी मारू इच्छितो.
एकदा “धन्यवाद” म्हणू इच्छितो.
एकदा “माफ कर” म्हणू इच्छितो.
पण आयुष्य ती संधी पुन्हा देत नाही.
म्हणून…
जिवाभावाची माणसं असताना त्यांच्यासाठी वेळ काढा.
फोन करा.
(Nostalgia Marathi Blog)भेटा.
मनातलं बोलून टाका.
कारण उद्या कोणासाठीही थांबत नाही.
आणि मग उरतं फक्त…
डोळ्यांत पाणी…
आठवणींची गर्दी…
आणि मनात कायमचं घुमणारं ते एकच गाणं…
“चिट्ठी ना कोई संदेश… जाने वो कौन सा देश… जहाँ तुम चले गए…”
काही गाणी फक्त ऐकायची नसतात…
ती जगायची असतात.
“चिट्ठी ना कोई संदेश…” हे असंच एक गीत(Nostalgia Marathi Blog) आहे.
आयुष्यात हरवलेल्या प्रत्येक माणसाची आठवण, न बोलता राहिलेले शब्द, न व्यक्त करता आलेलं प्रेम आणि आयुष्यभर मनात राहणारा पश्चात्ताप या सगळ्यांना हे गीत आवाज देतं.
म्हणूनच प्रत्येक वेळी ते कानावर पडलं की डोळे आपोआप ओलावतात आणि मन नकळत त्या सगळ्या माणसांकडे पुन्हा एकदा जाऊन पोहोचतं…
जे आज आपल्या सोबत नसले तरी…
कायम आपल्या हृदयात जिवंत (Nostalgia Marathi Blog)आहेत.
आणि शेवटी…
“चिट्ठी ना कोई संदेश… जाने वो कौन सा देश… जहाँ तुम चले गए…”
मला प्रचंड आवडतं हे गाणं…
तुम्हाला?
विवेक दिगंबरराव कुलकर्णी
