(पिंपरी) : गणेशोत्सवाच्या काळात उच्च न्यायालयाच्या आदेशांसह ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. १४ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात ध्वनिक्षेपक व डीजे सिस्टीम वाजविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी ५० गुन्हे दाखल केले असून, ४० ठिकाणांहून डीजे व ध्वनिक्षेपकांचे साहित्य जप्त केले (DJ equipment seized) आहे.
परिमंडळ १ अंतर्गत निगडी, पिंपरी आणि सांगवी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १५ ठिकाणांहून डीजे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक कारवाई(DJ equipment seized) झाली.
परिमंडळ २ मध्ये बावधन, काळेवाडी, हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक २१ गुन्हे दाखल झाले असून, १६ डीजे संच जप्त करण्यात आले. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी १० गुन्हे दाखल करण्यात (DJ equipment seized) आले.
परिमंडळ ३ मधील भोसरी, एमआयडीसी भोसरी आणि चाकण दक्षिण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच गुन्हे दाखल करून सहा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर परिमंडळ ४ अंतर्गत तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, दक्षिण महाळुंगे आणि शिरगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नऊ गुन्हे दाखल करून तीन ठिकाणांहून डीजे साहित्य जप्त करण्यात(DJ equipment seized) आले.
परिमंडळनिहाय कारवाई अशी : परिमंडळ १ – १५ गुन्हे, १५ जप्ती; परिमंडळ २ – २१ गुन्हे, १६ जप्ती; परिमंडळ ३ – ५ गुन्हे, ६ जप्ती; परिमंडळ ४ – ९ गुन्हे, ३ जप्ती. अशा प्रकारे एकूण ५० गुन्हे दाखल करून ४० ठिकाणी मुद्देमाल जप्त करण्यात(DJ equipment seized) आला.
गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांना त्रास होऊ नये, तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या आणि निर्धारित डेसिबल मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ध्वनिक्षेपकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यानही ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले (DJ equipment seized) आहे.
