पिंपरी-चिंचवड, दि. ५ जुलै २०२६ : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी करून नदी स्वच्छ, निर्मळ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांना तातडीच्या सूचना दिल्या. पाहणीनंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन (Mayor Ravi Landge) घेतले.
पाहणीदरम्यान नदीत निर्माण झालेल्या फेसाची महापौरांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्यामागील कारणांचा शोध घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नदीपात्रातील मोठ्या प्रमाणावर वाढलेली जलपर्णी त्वरित हटविणे, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत ठेवणे तसेच पावसामुळे वाढणाऱ्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठावरील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही त्यांनी (Mayor Ravi Landge)दिल्या.
यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “देशभरातून लाखो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करून श्री ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतात. त्यामुळे इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपणे आणि ती स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. वारकऱ्यांच्या श्रद्धेशी कोणतीही तडजोड केली जाणार (Mayor Ravi Landge) नाही.”

नदीत सांडपाणी, रासायनिक द्रव्ये किंवा अन्य प्रकारे प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच इंद्रायणी नदी कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आळंदी नगरपरिषद यांची संयुक्त बैठक लवकरच घेऊन दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी (Mayor Ravi Landge) दिली.
यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, गटनेते सचिन गिलबिले, नगरसेवक आदित्यराजे घुंडरे, दिनेश घुले, माजी शहराध्यक्ष किरण येळवंडे, युवा नेते अनिकेत तापकीर, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट, उपअभियंता पंकज धेंडे तसेच आळंदी नगरपरिषदेचे अधिकारी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित(Mayor Ravi Landge) होते.
