चिंचवड : चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी मंदिरातून निघणाऱ्या पारंपरिक ‘द्वारयात्रे’ला १३ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण चतुर्थी या चार दिवसांत चिंचवडगावाच्या चारही दिशांना असलेल्या द्वारदेवतांच्या मंदिरांना भेट देण्याची ही धार्मिक परंपरा (Morya Dwaryatra 2026)आहे.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० ते १५० भाविक या यात्रेत सहभागी होणार आहेत. दररोज सकाळी ९ वाजता श्री मंगलमूर्ती वाड्यातून वाजत-गाजत यात्रेला सुरुवात होईल. संजीवन समाधीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक संबंधित द्वारदेवतेच्या दर्शनासाठी रवाना (Morya Dwaryatra 2026)होतील.
द्वाराच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर द्वारदेवतेचे विधिवत पूजन करण्यात येईल. यावेळी श्री मोरया गोसावी यांनी रचलेली पदे, गोंधळ तसेच जोगवा सादर केला जाणार आहे. त्यानंतर यात्रा पुन्हा संजीवन समाधी मंदिरात परत येईल. तेथे श्री चिंतामणी महाराज यांच्या समाधीसमोर धूपारती करून यात्रेची सांगता (Morya Dwaryatra 2026)होईल.
यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री मंगलमूर्ती वाड्यात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले (Morya Dwaryatra 2026)आहे.
द्वारयात्रेचे वेळापत्रक
१३ ऑगस्ट – पूर्व द्वार : चिंचवड स्टेशनजवळील एम्पायर इस्टेट सोसायटी येथील श्री मांझराई देवी मंदिर.
१४ ऑगस्ट – दक्षिण द्वार : वाकड येथील श्री आसराई देवी मंदिर.
१५ ऑगस्ट – पश्चिम द्वार : रावेत येथील श्री ओझराई देवी मंदिर.
१६ ऑगस्ट – उत्तर द्वार : आकुर्डी येथील श्री मुक्ताई देवी मंदिर आणि श्री खंडोबा मंदिर.
या पारंपरिक द्वारयात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले (Morya Dwaryatra 2026)आहे.
