पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप परवानगी शुल्क माफ करावे तसेच सलग तीन वर्षांसाठी एकत्रित मंडप परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका रिटा सचिन सानप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे केली (PCMC Ganeshotsav)आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा महत्त्वाचा सण असून, पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे हा उत्सव उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करतात. उत्सवादरम्यान मंडळांकडून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमही राबविले जातात. मात्र, मंडप परवानगी शुल्क आणि दरवर्षी करावी लागणारी प्रशासकीय प्रक्रिया यामुळे मंडळांवर आर्थिक व प्रशासकीय ताण (PCMC Ganeshotsav)येतो.
त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप परवानगी शुल्क पूर्णपणे माफ करावे आणि दरवर्षी नव्याने कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी सलग तीन वर्षांची मंडप परवानगी एकाच वेळी देण्याची तरतूद करावी, अशी मागणी सानप यांनी केली(PCMC Ganeshotsav) आहे.

महापालिकेचे सर्व नियम, अटी आणि सुरक्षा नियमांचे मंडळांकडून काटेकोरपणे पालन केले जाईल. त्यामुळे या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून गणेश मंडळांना सहकार्य करावे, अशी विनंतीही सानप यांनी केली (PCMC Ganeshotsav)आहे.
