(चाकण, प्रतिनिधी ): चाकण औद्योगिक वसाहतीतील खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे लघु व मध्यम उद्योगांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या समस्यांमुळे सुमारे २० लघुउद्योग स्थलांतराच्या तयारीत असून, सुमारे दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल आणि हजारो रोजगार धोक्यात येण्याची शक्यता उद्योजकांनी व्यक्त केली (Chakan MIDC Roads issues)आहे.
चाकण एमआयडीसी देशातील महत्त्वाच्या वाहननिर्मिती केंद्रांपैकी एक आहे. मात्र, अंतर्गत व मुख्य रस्त्यांची दुरवस्था, मोठमोठे खड्डे, अरुंद रस्ते, अतिक्रमणे आणि रस्त्यांवर उभे केलेले ट्रक यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाच किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दोन तासांपर्यंत वेळ लागत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे (Chakan MIDC Roads issues)आहे.
पावसामुळे रस्त्यांची स्थिती आणखी बिकट झाली असून, कामगारांच्या पाळ्या तसेच कच्चा आणि तयार मालाच्या वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडत आहे. वाहनांचे नुकसान, इंधन आणि देखभाल खर्चातही वाढ होत आहे. मागील काही वर्षांत पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे ५० हून अधिक उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचा दावा उद्योजकांनी केला (Chakan MIDC Roads issues)आहे.
रस्त्यांवरील खड्डे १५ ते ३० दिवसांत दुरुस्त करून कामाची यादी व अंतिम मुदत जाहीर करावी, ‘चाकण रोड सेल’ स्थापन करावा, वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ट्रक टर्मिनलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच प्रमुख चौकांत वाहतूक पोलिस, सीसीटीव्ही व्यवस्था आणि विश्वासार्ह वीज-पाणीपुरवठा करावा, अशी मागणी उद्योजकांनी केली (Chakan MIDC Roads issues)आहे.
“पाच किलोमीटर अंतर कापण्यासाठी दोन तास लागत असतील, तर ही केवळ प्रवासाची नव्हे, तर उत्पादन आणि रोजगाराची समस्या आहे. पायाभूत सुविधा अपयशी ठरल्यास गुंतवणूक बाहेर जाते,” अशी भूमिका उद्योजकांनी (Chakan MIDC Roads issues)मांडली.

