प्रतिनिधी:निगडी ते खडकी परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरवस्था आणि वाढती वाहतूक यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत (PCMC Roads) आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहने ये-जा करतात. मात्र, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे चुकविताना अपघाताचा धोका वाढला(PCMC Roads) आहे.
पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे अचानक ब्रेक लावणे किंवा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता (PCMC Roads) आहे.

हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असल्याने प्रशासनाने तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत, तसेच रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचीही मागणी होत (PCMC Roads)आहे.
