चिंचवड, ता. 19 : उद्योगांनी ऊर्जा बचतीसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना स्वीकाराव्यात आणि शाश्वत विकासाला चालना मिळावी या उद्देशाने क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया – पुणे शाखेतर्फे “ऊर्जा संवर्धन स्पर्धा 2026” उत्साहात पार (Energy Saving Initiative)पडली.
भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटरमध्ये ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात आली. तसेच ऑनलाइन सादरीकरणांचे आयोजन येत्या 3 जून रोजी करण्यात आले (Energy Saving Initiative)आहे.
या स्पर्धेमुळे उद्योग क्षेत्रातील नाविन्यपूर्ण केस स्टडीजना व्यासपीठ मिळाले असून, विविध संस्थांनी आपल्या कार्यपद्धतीत शाश्वततेचा समावेश करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सादरीकरण केले. सर्जनशील घोषवाक्ये आणि आकर्षक पोस्टर्सच्या माध्यमातून सहभागी स्पर्धकांनी ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व प्रभावीपणे (Energy Saving Initiative)मांडले.
यावर्षीच्या स्पर्धेत 33 संस्थांमधील तब्बल 235 सहभागी उपस्थित होते. केस स्टडी, घोषवाक्य आणि पोस्टर या विभागांमध्ये एकूण 135 नामांकनांची नोंद झाली. ऊर्जा बचतीसंदर्भातील व्यावहारिक अनुभव, अभिनव संकल्पना आणि जनजागृतीपर संदेश यावेळी सादर करण्यात (Energy Saving Initiative)आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन एनआर इंडस्ट्रीजचे संचालक गौरव सबनीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी पुणे शाखेचे कौन्सिल सदस्य माधव बोरवणकर, परवीन तरफदार, धनंजय वाघोलीकर तसेच क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या संचालिका डॉ. रजनी इंदुलकर उपस्थित (Energy Saving Initiative)होत्या.
समारोप समारंभाला स्पार्क मिंडा (डाय कास्टिंग विभाग) चे बिझनेस हेड अजय कुमार, संचालिका डॉ. रजनी इंदुलकर आणि पुणे शाखेचे कौन्सिल सदस्य उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पुरस्कार प्रदान करण्यात(Energy Saving Initiative) आले.
केस स्टडी स्पर्धेचे परीक्षण चंद्रशेखर बापट, हनुमंत टिकाटे, वेंकटेश राव आणि प्रशांत मुधाळवाडकर यांनी केले. तर घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धेचे परीक्षण परवीन तरफदार आणि धनंजय वाघोलीकर यांनी(Energy Saving Initiative) केले.
कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी रहीम मिर्झा बेग, प्रशांत बोराटे आणि चंद्रशेखर रुमाले यांनी सांभाळली. सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी (Energy Saving Initiative)केले.
