प्रतिनिधी :आयपीएल 2026 हंगामात धावांचा पाऊस आणि थरारक रनचेस चाहत्यांना अनुभवायला मिळत असून, बुधवारी मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्याने स्पर्धेच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला. कोलकाताने मुंबईवर ४ गडी राखून दमदार विजय मिळवत या हंगामातील लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांचा ४२ वा विजय नोंदवला. एकाच आयपीएल हंगामात दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी मिळवलेल्या विजयांचा हा सर्वाधिक विक्रम ठरला (KKR vs MI)आहे.
यापूर्वी २०१६ च्या हंगामात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी ४१ सामने जिंकले होते. तो विक्रम आता IPL 2026 मध्ये मोडीत निघाला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेल्या ६५ सामन्यांपैकी तब्बल ४२ सामने दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. म्हणजेच सुमारे ६४.६ टक्के सामने धावपाठलाग करणाऱ्या संघांच्या बाजूने गेले(KKR vs MI) आहेत.
कोलकाता आणि पंजाब किंग्स यांच्यातील अनिर्णित सामना वगळल्यास ही टक्केवारी आणखी वाढून ६५.६ टक्क्यांपर्यंत पोहोचते. त्यामुळे यंदाचा हंगाम स्पष्टपणे धावपाठलाग करणाऱ्या संघांसाठी अधिक अनुकूल ठरत असल्याचे चित्र दिसत (KKR vs MI)आहे.
🔹 एका हंगामातील लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय
• IPL 2026 – ४२ विजय (६५ सामने)
• IPL 2016 – ४१ विजय (६० सामने)
• IPL 2011 – ४० विजय (७३ सामने)
मुंबई आणि कोलकाता यांच्यातील सामना देखील तितकाच रोमहर्षक ठरला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २४७ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, कोलकाताच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत अवघ्या १८.५ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य पार केले आणि सामना आपल्या नावावर(KKR vs MI) केला.
विशेषतः शेवटच्या षटकांतील आक्रमक फटकेबाजी आणि दबावाखाली केलेली फलंदाजी यामुळे KKR ने मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत इतिहास रचला. या विजयामुळे प्लेऑफच्या शर्यतीलाही नवा रंग चढला (KKR vs MI)आहे.
दरम्यान, सतत वाढणाऱ्या धावसंख्या, सपाट खेळपट्ट्या आणि गोलंदाजांना मिळणारी कमी मदत यामुळे प्रथम फलंदाजी करणारे संघ तोट्यात जात आहेत का, याबाबत क्रिकेटविश्वात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. IPL 2026 मध्ये धावांचा वर्षाव आणि लक्ष्याचा यशस्वी पाठलाग हेच स्पर्धेचे नवे वैशिष्ट्य ठरत असल्याचे दिसून येत (KKR vs MI)आहे.
