प्रतिनिधी :निगडीतील ‘रुद्रंग’ संस्थेचा १२ वा वर्धापन दिन आणि गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी तसेच गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त विशेष साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २४ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता सिंधुनगर येथील कॅ. कदम सभागृहात “लागले खूळ कलावंताला” हा कार्यक्रम रंगणार (Rudrang Pune) आहे.
या कार्यक्रमाची निर्मिती संकल्पना, निवेदन, संहिता आणि दिग्दर्शन रमेश यशवंत वाकनीस यांनी केले आहे. कार्यक्रमात गोविंदाग्रज लिखित ‘महाराष्ट्र गीत’, बाळकराम यांचे ‘कवींचा कारखाना’ व ‘कवीवर्य भांबूराव’, प्रसाद कुमठेकर लिखित ‘बारकुल्या बारकुल्या गोष्टी’, तसेच समाजसन्मुख कवितांचे सादरीकरण होणार आहे. याशिवाय गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांच्या बंगाली गीताचे आणि ‘मी रवींद्रनाथांची पत्नी’ या साहित्यकृतीचे अभिवाचनही होणार (Rudrang Pune) आहे.
कार्यक्रमास प्रज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक संस्था, चिखलीचे कार्यवाह यादवेंद्र जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नागेश जोशी, उज्वला केळकर, सागर यादव, किशोरी सरीन, अरुणा वाकनीस, डॉ. हेमंत हुईलगोलकर, स्मिता कुलकर्णी आणि रमेश वाकनीस हे वाचकस्वर सादर करणार(Rudrang Pune) आहेत.
हा कार्यक्रम रविवार, दि. २४ मे रोजी सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत कॅ. कदम सभागृह, रविंद्रनाथ ठाकूर ग्रंथालयासमोर, स्वा. सावरकर मंडळ, पेठ क्रमांक २५, सिंधुनगर, निगडी येथे होणार असून रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक रुद्रंग व अनुसंधान कला संस्था परिवाराच्या वतीने करण्यात आले (Rudrang Pune) आहे.
