(पिंपरी, २७ ऑगस्ट ): “कवितेत नकारात्मकता नसावी, तर शब्दवैभव नांदावे. प्रसाद, माधुर्य आणि ओज या गुणांनी कविता समृद्ध असावी. कवी कितीही मोठा झाला तरी त्याने कवितेसोबतच माणूसपण जपावे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विजय लोंढे उर्फ हरिसुत यांनी (Navayug Shravani Poetry) केले.
नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि स्वर्गवासी दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३३ व्या नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत अनिल भोईर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २७ येथील अरविंद-वृंदा सभागृहात बुधवारी (२६ ऑगस्ट) ही स्पर्धा झाली. प्रा. विजय लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र घावटे, सचिव माधुरी ओक आणि संचालक अनिकेत गुहे उपस्थित(Navayug Shravani Poetry) होते.
स्पर्धेसाठी सुमारे ९२ कवींनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७० कवींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कवितांचे सादरीकरण केले. अनिल भोईर यांनी प्रथम, सुभाष धाराशिवकर यांनी द्वितीय, तर दत्ता सुकाळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उमा इनामदार, वैशाली भांडारकर आणि श्रीकांत जगताप यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात(Navayug Shravani Poetry) आले.
विजेत्या कवींना सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रशस्तिपत्र, ग्रंथ, लेखणी आणि शाल देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कवयित्री वंदना इन्नाणी आणि काव्यरसिक संपत शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम (Navayug Shravani Poetry)पाहिले.
राज अहेरराव यांनी नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ गेल्या ३३ वर्षांपासून श्रावणी काव्यस्पर्धेच्या माध्यमातून कवितेचा प्रचार-प्रसार करीत असल्याचे सांगितले. कवींनी आपली कविता मनापासून जोपासावी आणि स्पर्धेतील कविता मुखोद्गत करून सादरीकरण करावे, असे आवाहन त्यांनी (Navayug Shravani Poetry) केले.
राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविकातून मंडळाच्या विविध साहित्यिक उपक्रमांची माहिती दिली. रजनी अहेरराव, माधुरी विधाटे, नेहा कुलकर्णी, नंदकुमार मुरडे, शरद काणेकर आणि प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. अरविंद वाडकर यांनी सूत्रसंचालन केले, तर पी. बी. शिंदे यांनी आभार(Navayug Shravani Poetry) मानले.
