चिंचवड, दि. ११ : “पदवी मिळवल्यानंतर केवळ नोकरी करण्याचे ध्येय न ठेवता, भविष्यात इतरांना रोजगार देण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी आतापासूनच करावा. मोठी स्वप्ने पाहा, अपयशाला घाबरू नका आणि ज्ञानासोबत आवश्यक कौशल्ये आत्मसात करा,” असे आवाहन उद्योगपती व समाजसेवक शैलेश शहा यांनी (pratibha College)केले.
प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६’चे आयोजन प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले. शैलेश शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन (pratibha College)झाले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ (नाना) शिवले, संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, बी.एड.च्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, समन्वयिका डॉ. श्रुती गणपुले यांच्यासह प्राध्यापक, पालक व विद्यार्थी उपस्थित (pratibha College)होते.
मार्गदर्शन करताना शैलेश शहा यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत दररोज नवीन काहीतरी शिकण्याचा, यशस्वी व्यक्तींची पुस्तके वाचण्याचा आणि नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला. मोबाईलचा योग्य वापर करा; मात्र त्याचे गुलाम बनू नका, असे सांगत अडचणीच्या काळात साथ देणारे आणि योग्य मार्गदर्शन करणारे मित्र निवडण्याचे आवाहनही त्यांनी (pratibha College)केले.
जगन्नाथ (नाना) शिवले यांनी विद्यार्थ्यांनी आई-वडिलांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी, असा संदेश दिला. अडचणीच्या प्रसंगी खचून न जाता माणसे ओळखण्याची क्षमता विकसित करा आणि आपल्या जबाबदारीचे भान ठेवा, असे त्यांनी (pratibha College)सांगितले.
संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी महाविद्यालयीन शिक्षणाची तीन वर्षे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. नियमित महाविद्यालयीन उपस्थिती, ग्रंथालयाचा वापर, प्राध्यापकांचे मार्गदर्शन तसेच व्यवहारज्ञान व पूरक कौशल्ये आत्मसात करण्यावर त्यांनी भर (pratibha College)दिला.
“आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी पुरेशी नाही. औद्योगिक आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक कौशल्ये आत्मसात केली, तरच स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करता येईल,” असे डॉ. शहा यांनी नमूद (pratibha College)केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गणेशवंदना, ‘महाराष्ट्राची लोकधारा’ आणि बॉलीवूड नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ‘माइंड स्पार्क’ स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात(pratibha College) आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांनी केली. उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. नव्या दंडवाणी व प्रा. कानन पडते यांनी केले, तर आभार डॉ. राजश्री ननावरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम (pratibha College)घेतले.
