पिंपरी-चिंचवड, दि. १७ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTC) चिखली परिसरातील ‘आदित्य लॉज’वर छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. यामध्ये बांगलादेशातून तस्करी करून आणलेल्या एका तरुणीचाही समावेश असल्याने खळबळ उडाली (Chikhali Aditya Lodge )आहे.
याप्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि लॉज कामगार अकिबुल खालेक मुल्ला यांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि आणखी एक मॅनेजर साहील ऊर्फ शाहीन शिराजुल मंडल यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Chikhali Aditya Lodge) आहे.
पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार शहरातील अवैध व्यवसायांविरुद्ध मोहीम सुरू असून, गुप्त माहितीच्या आधारे देहू-आळंदी रोडवरील लक्ष्मी चौकातील या लॉजवर छापा टाकण्यात आला. तपासात लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड(Chikhali Aditya Lodge) झाले.
दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या बांगलादेशी तरुणीला मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा शहरात आतापर्यंत अशा प्रकारच्या ११ कारवाया करण्यात आल्या असून त्यात ७ स्पा आणि ४ हॉटेलचा समावेश (Chikhali Aditya Lodge) आहे.
