(चिंचवड, १९ ऑगस्ट) : प्रभाग क्रमांक १८ मधील केशवनगर येथील आठवडे बाजार मैदानात यंदा गणेश विसर्जन हौद उभारू नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांनी केली (Ganesh Visarjan Tank) आहे.
गेल्या वर्षी या ठिकाणी गणेश विसर्जन हौद उभारण्यात आला होता. मात्र, त्याची आवश्यकता नसताना जनतेच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचा आरोप बच्चे यांनी केला. यंदाही हौद उभारण्याची तयारी सुरू असल्याचे समजत असून, प्रशासनाने नागरिकांची भूमिका लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी त्यांनी (Ganesh Visarjan Tank) केली.
याबाबत बच्चे यांनी सिंहगड ‘ब’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी तसेच प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे यांची भेट घेऊन निवेदन (Ganesh Visarjan Tank) दिले.
केशवनगरमधील विवेक वसाहत येथे आधीच कायमस्वरूपी गणेश विसर्जन घाट व हौदाची सुविधा आहे. विसर्जन काळात अतिरिक्त हौदाचीही व्यवस्था केली जाते. त्यामुळे आठवडे बाजार मैदानात स्वतंत्र हौद उभारण्याची गरज नसल्याचे बच्चे यांनी स्पष्ट (Ganesh Visarjan Tank)केले.

प्रशासनाने याची दखल न घेता हौद उभारण्याचा प्रयत्न केल्यास नागरिक स्वतःहून त्याठिकाणी येऊन विरोध करतील, असा इशाराही बच्चेयांनी (Ganesh Visarjan Tank) दिला.
