प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकात (एसएस सेल) कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार भगवंता मुठे यांचे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलासह त्यांच्या मित्रपरिवार आणि मूळ गावावर शोककळा पसरली (Police Officer Accident)आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगवंता मुठे हे सुट्टीसाठी आपल्या गावी गेले होते. अकोले परिसरात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू (Police Officer Accident) झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित(Police Officer Accident) केले.
भगवंता मुठे हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत होते. शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करणे तसेच गुन्हेगारीविरोधात कठोर पावले उचलण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. आपल्या शांत, संयमी आणि प्रामाणिक स्वभावामुळे त्यांनी सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले( Police Officer Accident) होते.
“एका उमद्या, धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ सहकाऱ्याला आम्ही गमावले आहे. मुठे यांचे निधन ही पोलीस दलासाठी मोठी हानी आहे,” अशा भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त (Police Officer Accident)केल्या.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. गुन्हे शाखेसह विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला असून अकोले येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार (Police Officer Accident)आहेत.
