पिंपरी-चिंचवड, दि. १३ : सफाई कामगारांच्या श्रमांचा सन्मान आणि स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणाऱ्या ‘अवकारिका’ या सामाजिक आशयाच्या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलर व पोस्टरचे अनावरण महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात (Avkarika Hindi Movie)आले.
स्वच्छ भारत मिशनच्या संकल्पनेवर आधारित या चित्रपटातून प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या सफाई कामगारांचे योगदान आणि त्यांच्या श्रमांचा सन्मान करण्याचा संदेश देण्यात आला आहे. स्वच्छता ही केवळ महानगरपालिका प्रशासन किंवा सफाई कामगारांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा विचार चित्रपटातून मांडण्यात आला (Avkarika Hindi Movie)आहे.
यावेळी नगरसदस्या सारिका मासुळकर, अभिनेता रोहित पवार, दिग्दर्शक सीए अरविंद भोसले, निर्माते भरत टिळेकर व अरुण जाधव यांच्यासह चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ आणि मान्यवर उपस्थित (Avkarika Hindi Movie)होते.
विशेष म्हणजे, ‘अवकारिका’च्या टीमने अजमेरा येथील एका उद्यानाची स्वच्छता व सुशोभीकरण करून त्याचा कायापालट केला आहे. नागरिकांच्या सहभागातून हे उद्यान स्वच्छता, खेळ, व्यायाम आणि सामाजिक उपक्रमांसाठी खुले करण्यात आले (Avkarika Hindi Movie)आहे.
महापौर रवि लांडगे म्हणाले, “स्वच्छ रस्ते आणि परिसरामागे सफाई कामगारांचे अथक परिश्रम असतात. त्यांच्या श्रमांचा सन्मान करण्यासाठी आपण स्वतः कचरा न करणे आणि शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ‘अवकारिका’ हा केवळ चित्रपट नसून स्वच्छतेबाबत नागरिकांच्या विचारांना सकारात्मक दिशा देणारा सामाजिक संदेश (Avkarika Hindi Movie)आहे.”
प्रत्येक नागरिकाने घर, सोसायटी आणि सार्वजनिक परिसरापासून स्वच्छतेची सुरुवात करावी, ओला-सुका कचरा वेगळा करावा आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. ‘स्वच्छ शहर, माझीही जबाबदारी’ ही भावना प्रत्येक नागरिकाने कृतीत उतरविल्यास स्वच्छतेची चळवळ खऱ्या अर्थाने लोकचळवळ बनेल, असेही महापौर लांडगे यांनी (Avkarika Hindi Movie)सांगितले.
