(पिंपरी, प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चार अधिकारी व अंमलदार ऑगस्ट २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीचा निरोप समारंभ सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस आयुक्तालयातील ‘शिवनेरी हॉल’ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा सन्मान करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात(Pimpri Chinchwad Police) आल्या.
सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी-अंमलदारांमध्ये पोलीस उपनिरीक्षक सुरेश भागुजी उले (पोलीस मुख्यालय), पोलीस उपनिरीक्षक अनिल बहादूर देशमुख (पिंपरी पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक अशोक भानुराम परदेशी (पिंपरी पोलीस ठाणे) आणि पोलीस शिपाई शशिकांत वापूसाहेब कांबळे, बक्कल क्रमांक २६९३ (हिंजवडी पोलीस ठाणे) यांचा समावेश (Pimpri Chinchwad Police)आहे.
या कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदार उपस्थित (Pimpri Chinchwad Police)होते.
यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांनी बजावलेल्या प्रदीर्घ आणि कर्तव्यदक्ष सेवेचा गौरव करण्यात आला. त्यांच्या सेवाकाळातील योगदानाला उजाळा देत पोलीस विभागाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांचाही या कार्यक्रमात सहभाग(Pimpri Chinchwad Police) होता.
सेवानिवृत्त अधिकारी-अंमलदारांना सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि शालगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना पुढील आयुष्य सुखी, निरोगी आणि आनंदी जावे, यासाठी शुभेच्छा देण्यात (Pimpri Chinchwad Police) आल्या.
