पिंपरी : शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीतील दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २४, रा. मरकळगाव, पुणे) आणि अविनाश ज्ञानोबा बाकलीकर (वय २८, रा. लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार तसेच अन्य आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू (PCMC Cyber Crime )आहे.
फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून ८६ लाख रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (PCMC Cyber Crime )आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांचे पथक तपास करीत होते. तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संबंधित बँक खात्यांची माहिती घेतली असता काही खाती मरकळगाव येथील तेजस ज्ञानोबा लोखंडे यांच्या नावावर असल्याचे समोर (PCMC Cyber Crime )आले.
त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक वैभव पाटील व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून तेजस लोखंडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर तो हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर(PCMC Cyber Crime ) आले.
तपासादरम्यान तेजस लोखंडे याचा साथीदार अविनाश बाकलीकर याच्याबाबतही पोलिसांना माहिती मिळाली. अविनाशला यापूर्वी २०२४ मध्ये शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात अटक झाली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. पुढे त्याने इतर साथीदारांच्या मदतीने सायबर गुन्ह्यांसाठी बँक खात्यांचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यांतून मिळणारी रक्कम स्वीकारण्यासाठी करण्यात आल्याचेही पोलिसांनी (PCMC Cyber Crime )सांगितले.
पोलिसांच्या तपासात सायबर फसवणुकीसाठी आतापर्यंत विविध आठ बँक खाती उघडून त्यांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच आणखी काही बँक खाती उघडण्यासाठी ‘STRUNOVA PVT LTD’ या नावाने कार्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती तपासात मिळाली आहे. या माध्यमातून सायबर गुन्ह्यांसाठी आर्थिक व्यवहारांची तयारी करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट(PCMC Cyber Crime ) केले.
८६ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्यांची तांत्रिक माहिती मिळवून पुढील कारवाई केली. तेजस लोखंडेकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचा साथीदार अविनाश बाकलीकर याचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान अविनाशने येरवडा कारागृहात असतानाही साथीदारांच्या मदतीने सायबर गुन्ह्यांचे नियोजन केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद(PCMC Cyber Crime ) केले.
अविनाश बाकलीकर हा बीएएमएस पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असतानाच परदेशातील साथीदारांच्या संपर्कात राहून अशा प्रकारचे सायबर गुन्हे करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. दोन्ही आरोपींचा या प्रकरणातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली(PCMC Cyber Crime ) आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड करीत (PCMC Cyber Crime )आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त (सायबर व आर्थिक गुन्हे) रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात (PCMC Cyber Crime )आली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे आणि पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी, सहायक पोलिस निरीक्षक वैभव पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे यांच्यासह पोलिस अंमलदारांनी कारवाईत सहभाग (PCMC Cyber Crime )घेतला.
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्याकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, गुन्ह्यातील अन्य आरोपी तसेच आर्थिक व्यवहाराशी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू (PCMC Cyber Crime )आहे.
