प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ३७ (१) व (३) लागू केले आहे. पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी जारी केलेला हा आदेश २७ मे २०२६ च्या मध्यरात्रीपासून ९ जून २०२६ पर्यंत लागू राहणार (Section 37 Order 2026)आहे.
या काळात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास, परवानगीशिवाय सभा-मिरवणुका काढण्यास तसेच भडकावू घोषणा, भाषणे आणि मोठ्या आवाजातील वाद्यप्रयोग करण्यास बंदी घालण्यात आली(Section 37 Order 2026) आहे.
तसेच तलवारी, भाले, काठ्या, बंदुका, दाहक पदार्थ, स्फोटके किंवा हल्ल्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यासही मनाई करण्यात आली आहे. समाजात तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे प्रचार साहित्य, प्रतिकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन किंवा दहन यावरही निर्बंध लागू करण्यात आले(Section 37 Order 2026) आहेत.
कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये आणि शहरातील शांतता अबाधित राहावी, यासाठी हे आदेश जारी करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शासन सेवेत कर्तव्य बजावणारे अधिकारी-कर्मचारी आणि कायदेशीर परवानाधारक सुरक्षा यंत्रणांना या आदेशातून सूट देण्यात आली (Section 37 Order 2026)आहे.
दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला (Section 37 Order 2026)आहे.
