पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षांचे सुधारित भाडे लागू झाल्यानंतर आतापर्यंत ११ हजार रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) पूर्ण झाले आहे. रिक्षाचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मीटर तपासणी केंद्रांची संख्या वाढविली असून, मंगळवारपासून (२२ सप्टेंबर) शिवाजीनगर आणि रामटेकडी येथे दोन नवीन केंद्रे सुरू करण्यात आली (Pune Rickshaw) आहेत.
पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या ३ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार १ सप्टेंबर २०२६ पासून रिक्षांचे सुधारित भाडे लागू झाले आहे. या भाड्यानुसार प्रवासी वाहतूक करण्यासाठी मीटरचे प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. आतापर्यंत पुणे शहरातील आठ हजार, तर पिंपरी-चिंचवडमधील तीन हजार रिक्षांच्या मीटरचे कॅलिब्रेशन पूर्ण झाले (Pune Rickshaw) आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे दीड लाख रिक्षा असून, सर्व मीटरचे प्रमाणीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी तपासणी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. कर्वेनगर, खराडी, शिवाजीनगर, रेंजहिल्स कॉर्नर आणि रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट येथे मीटर तपासणी व प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध(Pune Rickshaw) आहे.
मीटर तपासणी केंद्रांवर सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते १०, तर शनिवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत कामकाज होणार आहे. रविवारी आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी केंद्रे बंद (Pune Rickshaw) राहतील.
रिक्षाचालकांनी जवळच्या केंद्रावर जाऊन मीटरचे प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केले (Pune Rickshaw)आहे.
