आदरणीय विद्यानंदजी बापट यांना — एक अनाहूत पत्र,ॲड. जगदीश विसपुते (पुणे)
सप्रेम नमस्कार!आपली ध्वनीप्रदूषणाविरोधातील भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. ध्वनीप्रदूषणाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो आणि त्यावर नियंत्रण असायलाच हवे. मात्र, या प्रश्नाकडे पाहताना सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूळ संकल्पनेचा आणि त्यामागील सामाजिक इतिहासाचा विचार होणेही तितकेच आवश्यक (Pune Ganeshotsav) आहे.
गणपती घरी बसवणे ही श्रद्धेची बाब आहेच; पण सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही. तो महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग(Pune Ganeshotsav) आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देताना समाजातील विविध घटकांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला. त्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाने समाजात जागृती निर्माण करण्याचे, सामाजिक एकोपा वाढवण्याचे आणि सांस्कृतिक चळवळीला बळ देण्याचे काम केले. पुण्याच्या गणेशोत्सवाला तर या परंपरेत विशेष स्थान (Pune Ganeshotsav) आहे.
आजही अनेक गणेश मंडळे केवळ दहा दिवसांचा उत्सव साजरा करून थांबत नाहीत. वर्षभर रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती, पूर आणि आपत्तीग्रस्तांना मदत, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, व्यसनमुक्ती आणि पर्यावरण जनजागृती अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ती सहभागी (Pune Ganeshotsav) होतात.
दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग गणपती, कसबा गणपती, मंडई गणपती आणि नातूबाग गणपती यांसारख्या मंडळांनी सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांची परंपरा जपली(Pune Ganeshotsav) आहे.
सामाजिक बांधिलकीसोबतच सार्वजनिक गणेशोत्सवाचा आर्थिक परिणामही दुर्लक्षित करता येणार नाही. मूर्तिकार, कारागीर, फुलविक्रेते, मंडप व सजावट व्यावसायिक, कलाकार, छोटे दुकानदार, वाहतूकदार अशा अनेक घटकांना या उत्सवातून रोजगार आणि उत्पन्नाची संधी (Pune Ganeshotsav) मिळते.
अर्थात, याचा अर्थ गणेशोत्सवाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार योग्य आहेत, असा अजिबात नाही. ध्वनीप्रदूषण, डीजेचा दणदणाट, वाहतुकीला अडथळा, अनावश्यक खर्च, पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रथा यांना निश्चितच आळा बसला(Pune Ganeshotsav) पाहिजे.
पण गैरप्रकारांना विरोध करताना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पनाच चुकीची ठरवणे योग्य ठरेल का?म्हणून प्रश्न ‘गणपती सार्वजनिक की घरगुती?’ असा असण्यापेक्षा,‘सार्वजनिक गणेशोत्सव अधिक संस्कारी, पर्यावरणपूरक, समाजोपयोगी आणि ध्वनीप्रदूषणमुक्त कसा करता येईल?’हा असायला (Pune Ganeshotsav)हवा .
उत्सव बंद करणे हा उपाय नाही; उत्सवाचे बदलते स्वरूप अधिक विधायक करणे हा खरा मार्ग आहे.डीजेचा दणदणाट बंद करूया; पण समाजाला जोडणारा सार्वजनिक गणेशोत्सव बंद करू नका.परंपरा जपूया, दोष दूर करूया आणि गणेशोत्सवाला अधिक समाजोपयोगी (Pune Ganeshotsav) बनवूया.
गणपती उत्सव राहू द्या… त्याचे स्वरूप बदलूया!
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
ॲड. जगदीश विसपुते (पुणे).
