प्रतिनिधी :अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी देशभरात पुकारण्यात आलेल्या केमिस्ट बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा बंद यशस्वीपणे पार पडला असून पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे २५०० हून अधिक केमिस्ट बांधवांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. शहरात शंभर टक्के बंद पाळण्यात (Pcmc chemsist Strike)आला.
या बंदामागील प्रमुख कारण म्हणजे सध्या अत्यंत चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेली ऑनलाइन औषध विक्री होय. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर गर्भपातासाठीची औषधे, नशेसाठी वापरली जाणारी औषधे तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री होऊ नयेत अशी औषधे नियमांचे उल्लंघन करून सहज उपलब्ध करून दिली जात आहेत. ही बाब नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक (Pcmc chemsist Strike)आहे.
तसेच, ग्राहकांना मोठ्या सवलती व अधिक नफ्याचे आमिष दाखवून डुप्लिकेट औषधांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना बनावट आणि मूळ औषधांमधील फरक ओळखणे कठीण असल्याने अनेक ग्राहक फसवले जात आहेत. यासंदर्भातील अनेक प्रकरणे पुराव्यांसह उघडकीस आली (Pcmc chemsist Strike)आहेत.
केमिस्ट बांधव हे नेहमीच नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी पार पाडत असतात. योग्य मार्गदर्शन, प्रिस्क्रिप्शनची पडताळणी आणि सुरक्षित औषध वितरण ही जबाबदारी प्रत्यक्ष औषध विक्रेत्यांकडूनच प्रभावीपणे पार पडू शकते. त्यामुळे औषध विक्री ही अधिकृत आणि प्रशिक्षित केमिस्टमार्फतच होणे आवश्यक (Pcmc chemsist Strike)आहे.
मधुकर बहिरु बच्चे
चैतन्य मेडिकल काकडे पार्क (Pcmc chemsist Strike)चिंचवड
