(पिंपरी, प्रतिनिधी ): मालमत्ता कर कमी करून देण्याच्या मोबदल्यात १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी करसंकलन कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात ताब्यात घेतले. उमेश सुबराव कुटे (वय ३७, रा. नेवाळे वस्ती, चिखली) असे आरोपी लिपिकाचे नाव (PCMC Property Tax Bribe)आहे.
पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५९ वर्षीय तक्रारदारांनी पिंपळे गुरव येथे क गुंठा जागा खरेदी करून त्यावर तीन मजली इमारत बांधली आहेया इमारतीच्या नवीन मालमत्ता कर आकारणीसाठी त्यांनी २०२६ रोजी सांगवी करसंकलन विभागीय कार्यालयात अर्ज केला (PCMC Property Tax Bribe)होता.
या अर्जाच्या अनुषंगाने कुटे याने इमारतीचा वार्षिक मालमत्ता कर ९१ हजार ४७२ रुपये येत असल्याचे सांगून तो ५० हजार रुपयांपेक्षा कमी करून देण्यासाठी सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १ लाख ३० हजार रुपये देण्याचे(PCMC Property Tax Bribe) ठरले.
तक्रारदाराने याबाबत ACB पुणे कार्यालयाकडे तक्रार केली. ३ सप्टेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी केल्यानंतर कुटे याने १ लाख २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर आनंदनगर, सांगवी येथील स्विमिंग टँक रोडवर दुपारी दोनच्या सुमारास सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कुटेला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात (PCMC Property Tax Bribe)आले.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू(PCMC Property Tax Bribe) आहे.
ही कारवाई ACB पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके, पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे आणि त्यांच्या पथकाने(PCMC Property Tax Bribe) केली.
लाच मागितल्यास ACBशी संपर्क साधण्याचे आवाहन
शासकीय कामासाठी कोणताही लोकसेवक लाच मागत असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता ACB पुणे कार्यालयाशी ०२०-२६१३२८०२, व्हॉट्सअॅप क्रमांक ९४०३७८१०६४ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले (PCMC Property Tax Bribe)आहे.
