(पिंपरी, २६ ऑगस्ट ): “अंमली पदार्थांचा विळखा म्हणजे वाघाची गुहा आहे. चुकून किंवा कुतूहलाने अंमली पदार्थांचे सेवन सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात,” असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांनी(Drug Awareness) दिला.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीएटी), आकुर्डी प्राधिकरण येथे मंगळवारी (२५ ऑगस्ट) ‘अंमली पदार्थांना नकार… यशस्वी जीवनाकडे वाटचाल!’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२), रिजन ३, लायन्स क्वेस्ट, भोई प्रतिष्ठान आणि पीसीएटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम (Drug Awareness)झाला.
यावेळी लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रेयस दीक्षित, लायन्स क्वेस्ट डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन प्रदीप कुलकर्णी, लायन्स रिजन चेअरपर्सन सलीम शिकलगार, लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सच्या अध्यक्षा अनुजा करवडे, रवी सातपुते आणि पीसीएटीच्या डीन डॉ. शीतल रवंदळे उपस्थित (Drug Awareness)होते.
प्रदीप कुलकर्णी यांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून महाराष्ट्रातील तरुणाईला वाचविण्यासाठी उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली. श्रेयस दीक्षित यांनी मोहाचा एक क्षण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, असा संदेश दिला. डॉ. शीतल रवंदळे यांनी २०४७ मधील विकसित भारताची जबाबदारी आजच्या निर्व्यसनी तरुणाईवर असल्याचे (Drug Awareness)सांगितले.
भोई प्रतिष्ठानच्या ध्वनिचित्रफितीद्वारे अंमली पदार्थांचे प्रकार, व्यसनाची कारणे, त्याचे दुष्परिणाम, व्यसनाधीन व्यक्तीची लक्षणे आणि पुनर्वसन याबाबत जनजागृती करण्यात आली. सजगता आणि वेळीच हस्तक्षेप केल्यास एखाद्या तरुणाचे जीवन वाचवता येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी अंमली पदार्थांविरोधातील जनजागृतीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. भोई यांनी (Drug Awareness)केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला कुलकर्णी यांनी केले. अनुजा करवडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता (Drug Awareness)झाली.
