कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३०० धावा करत दमदार सुरुवात केली. देवदत्त पडिकलने सलग दुसऱ्या कसोटीत शतक झळकावत भारताच्या डावाला भक्कम आधार दिला. कर्णधार शुभमन गिलनेही अर्धशतकी खेळी करत पडिकलला उत्तम साथ (Padikkal century)दिली.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र सुरुवातीलाच केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांच्या विकेट गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यानंतर पडिकल आणि गिल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत डाव सावरला. गिलने ५० धावांची संयमी खेळी(Padikkal century) केली.
पडिकलची शानदार शतकी खेळी
पडिकलने आपल्या संयमी आणि तंत्रशुद्ध फलंदाजीने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा सामना केला. त्याने १९३ चेंडूंत ११७ धावांची खेळी करत १२ चौकार लगावले. हे त्याचे या मालिकेतील सलग दुसरे शतक असून, पहिल्या कसोटीतही त्याने १६७ धावांची दमदार खेळी केली होती. त्यामुळे कसोटी मालिकेत सलग दोन शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत त्याने आपले नाव नोंदवले(Padikkal century) आहे.
पडिकलला सुरुवातीला दोन जीवदाने मिळाली; मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेत त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. गिल बाद झाल्यानंतरही त्याने संयम कायम ठेवत शतक पूर्ण केले. अखेर त्याचा अडसर दूर करण्यात श्रीलंकेच्या केशारा नुवान्थाला यश (Padikkal century)आले.
पंतला दुखापत; जडेजाचीही झुंज
भारताला या डावात ऋषभ पंतच्या दुखापतीचा धक्का बसला. लाहिरू कुमारा याचा चेंडू हाताच्या मनगटावर आदळल्यानंतर पंतला ३ धावांवर ‘रिटायर्ड हर्ट’ व्हावे लागले. त्यानंतर रवींद्र जडेजाने पडिकलसोबत चौथ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. जडेजालाही हातावर चेंडू लागला आणि अखेर तो ४३ धावांवर बाद (Padikkal century)झाला.
कुलदीपच्या जागी सारांश जैनला पदार्पणाची संधी
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. आजारपणातून पूर्णपणे सावरला नसल्याने अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवला अंतिम अकरामधून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी ३३ वर्षीय सारांश जैनला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. जैनला सामन्यापूर्वी रविंद्र जडेजाकडून भारताची कसोटी कॅप (Padikkal century)मिळाली.
पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल ७, तर पदार्पणवीर सारांश जैन ४ धावांवर नाबाद होता. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने तीन बळी घेतले. मात्र पडिकलच्या शतकी खेळीमुळे भारताने दिवसअखेर ५ बाद ३०० धावांची मजबूत मजल मारत सामन्यावर आपली पकड मजबूत केली(Padikkal century) आहे.
