पिंपरी, दि. १६ जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा बहुचर्चित विषय सोमवारी (दि. १५) झालेल्या महासभेत अंतिम निर्णयाविना दप्तरी दाखल करण्यात आला. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या या विषयावर पुन्हा निर्णय न झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले (General Body Meeting )आहे.
महानगरपालिकेतील विद्यमान पक्षीय बलाबलानुसार १० स्वीकृत नगरसेवकांपैकी भाजपचे ७ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ सदस्य नियुक्त होऊ शकतात. मात्र, नियुक्तीबाबतचा प्रस्ताव वारंवार महासभेत येऊनही अंतिम निर्णय होत नसल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली (General Body Meeting )आहे.
महासभेत विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी हा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या तीन सदस्यांची नावे यापूर्वीच प्रशासनाकडे सादर केल्याचे सांगितले. भाजपला त्यांच्या सात सदस्यांबाबत निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ हवा असल्यास तो घ्यावा, मात्र राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांची नियुक्ती तातडीने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी (General Body Meeting )केली.
दुसरीकडे, महापालिका प्रशासनाने सादर केलेला विषय अपूर्ण स्वरूपात असल्याचा मुद्दा सत्ताधारी भाजपकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे विषयावरील निर्णय पुढे ढकलत तो दप्तरी दाखल करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. प्रशासनाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून विषय पुन्हा महासभेपुढे सादर करावा, असे निर्देश देण्यात (General Body Meeting )आले.
स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा विषय दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी महासभेत या विषयावर अंतिम निर्णय होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले (General Body Meeting )आहे.
