(पिंपरी , दि. २७) : भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या वतीने मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे राज्यस्तरीय पदाधिकारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांतून ६ हजारांहून अधिक माथाडी पदाधिकारी या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी (Mathadi Mahamelava) दिली.
मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री रविंद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते दुपारी २ वाजता होणार आहे. यावेळी माथाडी कामगारांचा रोजगार, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच संघटना अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आगामी कार्यक्रमांवर विचारविनिमय केला जाणार(Mathadi Mahamelava) आहे.
संघटनेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने २०३० पर्यंत ३० हजार पदाधिकाऱ्यांना संघटनेशी जोडण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आवश्यक नियोजन आणि संघटनात्मक उपाययोजनांवरही महामेळाव्यात चर्चा होणार(Mathadi Mahamelava) आहे.
दरम्यान, महामेळाव्याच्या निमित्ताने बेरोजगार युवकांसाठी ‘पंडित दीनदयाळ रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील विविध उद्योगांतील कंपन्यांचे प्रतिनिधी या उपक्रमात सहभागी होणार असून, पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पाचवीपासून उच्चशिक्षित उमेदवारांपर्यंत विविध स्तरांतील युवकांना संधी देण्यात येणार असून, तत्काळ नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी ‘जॉब कार्ड’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी (Mathadi Mahamelava)सांगितले.
या पत्रकार परिषदेला विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, जयदीप खापरे, इम्रान पानसरे यांच्यासह कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित (Mathadi Mahamelava)होते.
महाराष्ट्रात माथाडी कामगारांच्या रोजगाराचे नियमन, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणासाठी स्वतंत्र माथाडी मंडळांची व्यवस्था आहे. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ अंतर्गत राज्यात माथाडी मंडळांची स्थापना करण्यात आली (Mathadi Mahamelava)आहे.
