पिंपरी, पुणे (दि. १७ मे २०२६) – भक्ती, अध्यात्म, संगीत आणि संस्कृतीचा सुरेल संगम असलेल्या “अंतर्नाद” या भव्य संगीत नाटकाच्या शुभारंभ प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (दि.१६) पार पडलेल्या या प्रयोगाने उपस्थित प्रेक्षकांना अक्षरशः भारावून (Antarnaad Marathi Natak) टाकले.
यावेळी बोलताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी म्हणाले, “आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात प्रत्येक माणूस कुठेतरी हरवलेला आहे. स्वतःमधील विठ्ठल शोधण्यासाठी ‘अंतर्नाद’ अनुभवणे गरजेचे आहे. हे नाटक केवळ मनोरंजन करत नाही, तर प्रत्यक्ष वारीचा आणि विठ्ठल दर्शनाचा अनुभव देते. विशेष म्हणजे, या नाटकातील सर्व गीते खास या प्रयोगासाठी नव्याने लिहिण्यात आली आहेत. त्यामुळे हा प्रयोग अधिक वेगळा आणि नाविन्यपूर्ण(Antarnaad Marathi Natak) ठरतो.”
या कार्यक्रमाला आळंदी ज्ञानेश्वर संस्थान कमिटीचे अध्यक्ष भावार्थ देखणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तसेच मोरया थिएटरचे संस्थापक आणि “अंतर्नाद”चे निर्माते भाऊसाहेब भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित (Antarnaad Marathi Natak)होते.
भावार्थ देखणे म्हणाले, “अंतर्नाद पाहताना प्रत्येक प्रेक्षक भक्तीरसात पूर्णपणे तल्लीन झाला होता. ज्ञान, ध्यान आणि समाधान म्हणजेच खरी पंढरपूर वारी, असे माझे वडील डॉ. रामचंद्र देखणे नेहमी सांगायचे. या नाटकाने तेच तत्त्व जिवंत केले. अडीच तासांचा हा प्रवास प्रेक्षकांना आत्मिक समाधान देतो. कलाकारांनी प्रत्यक्ष भगवंताचे रूप धारण करून आम्हालाही भक्तीत नाचवले. या प्रयोगात मला माझ्या वडिलांचे दर्शन (Antarnaad Marathi Natak)घडले.”
नाटकाचे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “अंतर्नादची निर्मिती करताना मला माझी आई पुन्हा भेटल्यासारखे वाटले. ५१ कलाकारांच्या टीमने पहिल्याच प्रयोगात अनुभवी कलाकारांप्रमाणे उत्कृष्ट सादरीकरण(Antarnaad Marathi Natak) केले.”

या संगीत नाटकाचा दुसरा प्रयोग शुक्रवार, दि. २२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात रंगणार आहे. नाटकाची तिकिटे ‘बुक माय शो’ आणि ‘तिकीट खिडकी’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून चिंचवड नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवरही विक्री सुरू(Antarnaad Marathi Natak) आहे.
दिग्दर्शक मनोज डाळिंबकर यांनी सांगितले की, “प्रणव सपकाळे, निरंजन पेडगावकर, अंकिता शिवतरे, राजू बंग यांच्यासह सर्व कलाकारांनी पहिलाच प्रयोग अत्यंत दमदार पद्धतीने सादर (Antarnaad Marathi Natak)केला.”
विशेष म्हणजे, या नाटकात पोवाडा, पिंगळा, वासुदेव, लावणी, जात्यावरची गाणी, भूपाळी आणि आधुनिक रॅप साँग यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे. नाटकाचे लेखन विनोद रत्ना यांनी केले असून संकल्पना व दिग्दर्शन मनोज डाळिंबकर यांचे आहे. संगीत निरंजन पेडगावकर यांचे असून गीते मुराद तांबोळी यांनी लिहिली आहेत. नृत्यदिग्दर्शन अंकिता शिवतरे आणि सौगंध कापसे यांनी केले आहे. प्रकाशयोजना अभिप्राय कामठे, रंगभूषा कमलेश बिचे, वेशभूषा वेदिका काळे यांनी सांभाळली असून सहाय्यक दिग्दर्शन आकाश थिटे यांनी केले(Antarnaad Marathi Natak) आहे.

