पिंपरी, दि. १२ मे २०२६ : युनायटेड किंगडममधील मराठी बांधवांचे प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या ‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’च्या वास्तूसाठी जागा “फ्री होल्ड” करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी परकीय चलनाद्वारे वितरित केला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले (MLA Shankar Jagtap) आहे.
या संदर्भातील अधिकृत माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्राद्वारे आमदार शंकर जगताप यांना दिली (MLA Shankar Jagtap) आहे.
आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की, लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र मंडळ हे सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र म्हणून कार्यरत आहे. तेथील मराठी समुदायाच्या सोयीसाठी आणि संस्थेच्या दीर्घकालीन स्थैर्यासाठी मंडळाच्या जागेची मालकी हक्काने खरेदी होणे अत्यंत आवश्यक होते. यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पाठपुरावा करण्यात आला (MLA Shankar Jagtap) होता.
मराठी भाषा आणि संस्कृतीचा परदेशात प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने राज्य शासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेतली. त्यानुसार मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत ‘राज्य मराठी विकास संस्था’मार्फत २५ मार्च २०२६ रोजी ५ कोटी रुपयांचा निधी थेट महाराष्ट्र मंडळ, लंडनला परकीय चलनाद्वारे वितरित करण्यात (MLA Shankar Jagtap)आला.
मराठी संस्कृतीच्या संवर्धनाला मिळणार नवे बळ
महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून लंडनमध्ये मराठी सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी भाषा वर्ग आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. आता कायमस्वरूपी जागा उपलब्ध झाल्यामुळे मराठी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन अधिक व्यापक पद्धतीने करता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात (MLA Shankar Jagtap)आहे.
परदेशातील मराठी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे पिंपरी-चिंचवडसह लंडनमधील मराठी वर्तुळातून स्वागत आणि कौतुक होत (MLA Shankar Jagtap)आहे.
“लंडनमधील मराठी बांधवांसाठी ‘महाराष्ट्र मंडळ’ हे केवळ एक सांस्कृतिक केंद्र नसून, सातासमुद्रापार मराठी संस्कृती जपणारे आपले हक्काचे घर आहे. मंडळाला कायमस्वरूपी जागा मिळावी, ही अनेक वर्षांची मागणी होती. मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्र्यांनी या विषयात दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. हा निधी म्हणजे केवळ आर्थिक मदत नसून मराठी भाषा आणि संस्कृतीला दिलेले बळ आहे. आता लंडनमध्ये मराठी संस्कृती अधिक जोमाने फुलेल आणि पुढील पिढ्याही आपल्या मुळांशी जोडल्या जातील, याचा मला अभिमान (MLA Shankar Jagtap)वाटतो.”
— शंकर जगताप
(आमदार, चिंचवड विधानसभा (MLA Shankar Jagtap)मतदारसंघ)
