(चिंचवड ,प्रतिनिधी ): भारतीय स्वातंत्र्यलढा तसेच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात कामगारांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. राष्ट्राच्या उभारणीत कामगार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, समाज आणि देशाच्या प्रगतीचा तो कणा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते व साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी (Arun Borhade) केले.
महाराष्ट्र शासन अंगीकृत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (पुणे विभाग) यांच्या वतीने आयोजित वासंतिक व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत (Arun Borhade)होते.
“महाराष्ट्र राज्य आणि कामगार चळवळ” या विषयावरील व्याख्यानात त्यांनी आधुनिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कामगारांचे योगदान, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कामगारांची भूमिका, कामगार चळवळीतील महत्त्वाचे टप्पे, बदलते कामगार धोरण आणि त्याचे परिणाम तसेच आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसमोरील आव्हाने यावर सविस्तर भाष्य (Arun Borhade)केले.
राज्याच्या विकासात कामगार आणि कष्टकऱ्यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगताना बोऱ्हाडे म्हणाले, “कामगार झोपला तर समाज पुन्हा गुलामगिरीकडे जाईल.” त्यामुळे कामगारांनी संघटन, संघर्ष आणि संवाद या त्रिसूत्रीपासून दूर न जाता जागरूक राहून एकजुटीने कामगार चळवळीला अधिक बळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित (Arun Borhade)केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्लिकार्जुन इंगळे होते, तर राजेश हजारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी श्रीधर वाल्हेकर, रामभाऊ सासवडे, अलंकार हिंगे, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, मोहम्मद मुलाणी तसेच विविध उद्योगांतील कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित (Arun Borhade)होते.
कार्यक्रमाचे संयोजन प्रदीप बोरसे यांनी(Arun Borhade) केले.
