प्रतिनिधी :हाँगकाँग येथे ९ आणि १० मे रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत कु. प्रणित गणेश आढाव याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ‘ट्रॅडिशनल योगा’ आणि ‘आर्टिस्टिक योगा’ या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावत त्याने जागतिक स्तरावर भारताचा झेंडा (Double Gold Medal) उंचावला.
या प्रतिष्ठित स्पर्धेत यजमान हाँगकाँगसह भारतासह जगातील ११ देशांतील नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या या स्पर्धेत प्रणितने आपल्या उत्कृष्ट योगकौशल्याने परीक्षक आणि प्रेक्षकांची विशेष दाद (Double Gold Medal)मिळवली.
‘ट्रॅडिशनल योगा’ प्रकारात प्रणितने शिस्तबद्ध, अचूक आणि संतुलित योगासने सादर करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. तर ‘आर्टिस्टिक योगा’मध्ये संगीताच्या तालावर सादर केलेल्या लवचिक हालचाली, एकाग्रता आणि कलात्मकतेच्या सुंदर संगमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध (Double Gold Medal) केले.
प्रणितच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा गौरव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दुहेरी सुवर्णपदक मिळवल्याबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि योगप्रेमींकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत (Double Gold Medal) आहे.
