पिंपरी-चिंचवड : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिंचवड येथील प्रीमियर प्लाझा मॉलमधील एका स्पा सेंटरवर छापा टाकून कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा चालकाला अटक करण्यात आली (Chinchwad Spa Raid)आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सापळा रचून कारवाई केली. छाप्यादरम्यान स्पा सेंटरच्या आडून वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस (Chinchwad Spa Raid)आले.
या प्रकरणी स्पा चालक शहानवाज रिफाई याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणातील अमोल जाधव हा संशयित आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू(Chinchwad Spa Raid) आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच अन्य महत्त्वाचे साहित्य जप्त केले. सुटका करण्यात आलेल्या दोन महिलांना आवश्यक ती मदत व संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले (Chinchwad Spa Raid)आहे.
शहरातील स्पा, मसाज पार्लर आणि तत्सम आस्थापनांवर पोलिसांचे विशेष लक्ष असून अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी (Chinchwad Spa Raid)सांगितले.
