पिंपरी-चिंचवड, ३१ मे २०२६ : हिंजवडी आयटी पार्क परिसरासह ताथवडे, पुनावळे आणि वाकड भागातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या परिसरातील प्रलंबित सेवा रस्त्यांची (सर्व्हिस रोड) कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. तसेच ताथवडे आणि पुनावळे येथील अंडरपासचे रुंदीकरण करण्यासही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला (Hinjawadi Wakad Traffic)आहे.
पुण्यात शनिवारी राष्ट्रीय महामार्गांवरील प्रलंबित प्रकल्पांच्या आढावा बैठकीचे आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीत चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (पुणे पश्चिम बायपास) परिसरातील गंभीर वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित(Hinjawadi Wakad Traffic) केला.
हिंजवडी आयटी पार्क, वेगाने वाढणाऱ्या निवासी व व्यावसायिक वसाहती आणि वाहनसंख्येतील मोठी वाढ यामुळे या मार्गांवर प्रचंड वाहतूक ताण निर्माण होत असल्याचे त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून (Hinjawadi Wakad Traffic)दिले.
सेवा रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण होणार
आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की, सयाजी अंडरपास, भुमकर चौक, ताथवडे अंडरपास, पुनावळे अंडरपास, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन आणि मामुर्डी अंडरपास परिसरात विद्यमान पायाभूत सुविधा वाहनांच्या वाढत्या संख्येसाठी अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे दररोज सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण (Hinjawadi Wakad Traffic)होते.
ही समस्या सोडविण्यासाठी सेवा रस्त्यांचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांना कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश (Hinjawadi Wakad Traffic) दिले.
अतिरिक्त अंडरपास आणि बॉक्स स्ट्रक्चर्सलाही हिरवा कंदील
पुनावळे, वाकड, किवळे आणि रावेत परिसरातून दररोज हजारो खासगी व व्यावसायिक वाहने प्रवास करतात. भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन या भागात अतिरिक्त बॉक्स स्ट्रक्चर्स (भुयारी मार्गिका) तसेच नवीन अंडरपास उभारण्याबाबतही केंद्रीय स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला (Hinjawadi Wakad Traffic)आहे.
या प्रकल्पांमुळे वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात (Hinjawadi Wakad Traffic)आहे.
नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
“ताथवडे, पुनावळे आणि वाकड परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सेवा रस्ते आणि अंडरपासचे रुंदीकरण अत्यावश्यक होते. केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांसह हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल,” असे आमदार शंकर जगताप यांनी (Hinjawadi Wakad Traffic)सांगितले.

