प्रतिनिधी :देशातील सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून दोन्ही इंधनांच्या किमती प्रति लिटर सुमारे ३ रुपयांनी वाढल्या आहेत. या वाढीमुळे वाहनचालकांसह सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार (Petrol Price Hike) आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ आणि जागतिक घडामोडींचा परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर झाल्याचे मानले जात आहे. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर पुन्हा १०६ रुपयांच्या पुढे गेला असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण (Petrol Price Hike) आहे.
प्रमुख शहरांतील पेट्रोलचे नवे दर (प्रति लिटर)
मुंबई : १०६.६८ रुपये (३.१४ रुपयांची वाढ)
दिल्ली : ९७.७७ रुपये (३.०० रुपयांची वाढ)
कोलकाता : १०८.७४ रुपये (३.२९ रुपयांची वाढ)
चेन्नई : १०३.६७ रुपये (२.८३ रुपयांची वाढ)
दरम्यान, डिझेलच्या किमती वाढल्याने मालवाहतूक क्षेत्रावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतूक खर्च वाढल्यास अन्नधान्य, भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात, अशी चिंता व्यापारी आणि नागरिकांकडून व्यक्त होत (Petrol Price Hike)आहे.
प्रमुख शहरांतील डिझेलचे नवे दर (प्रति लिटर)
मुंबई : ९३.१४ रुपये (३.११ रुपयांची वाढ)
दिल्ली : ९०.६७ रुपये (३.०० रुपयांची वाढ)
कोलकाता : ९५.१३ रुपये (३.११ रुपयांची वाढ)
चेन्नई : ९५.२५ रुपये (२.८६ रुपयांची वाढ)
गेल्या काही दिवसांपासून इंधन दर स्थिर होते. मात्र अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे मासिक बजेट बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक वाहतूक, खासगी प्रवास आणि दैनंदिन जीवनावश्यक खर्चावर या वाढीचा थेट परिणाम होणार असल्याचे चित्र (Petrol Price Hike)आहे.
