प्रतिनिधी :ई-स्पोर्ट्सच्या जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धांपैकी एक असलेल्या Free Fire Esports World Cup 2026 ला 15 जुलैपासून सुरुवात होत असून जगभरातील गेमिंग चाहत्यांचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जगातील 24 सर्वोत्तम संघ जागतिक विजेतेपदासाठी भिडणार आहेत. लाखो डॉलर्सची बक्षीस रक्कम, सर्वोच्च दर्जाची स्पर्धा आणि जगातील अव्वल खेळाडूंची उपस्थिती यामुळे या स्पर्धेला ई-स्पोर्ट्स विश्वातील ‘विश्वचषक’ मानले (Free Fire Max)जाते.
भारतीय चाहत्यांसाठी यंदाची स्पर्धा आणखी खास आहे. कारण भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघात पुणे आणि विशेषतः पिंपरी-चिंचवडचा मानव उर्फ ‘Shoto FF’ सहभागी आहे. अवघ्या १८ व्या वर्षी त्याने आपल्या अचूक गेम सेन्स, शांत स्वभाव आणि प्रभावी रणनीतीच्या जोरावर भारतीय ई-स्पोर्ट्समध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्थानिक स्पर्धांपासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता जागतिक स्पर्धेपर्यंत पोहोचला असून पिंपरी-चिंचवडसाठी हा अभिमानाचा क्षण (Free Fire Max)आहे.
Free Fire MAX म्हणजे काय?
Garena कंपनीने विकसित केलेला Free Fire MAX हा सध्या भारतात उपलब्ध असलेला लोकप्रिय बॅटल रॉयल मोबाईल गेम आहे. २०१७ मध्ये मूळ Free Fire गेम प्रदर्शित झाला होता. २०२२ मध्ये भारतात मूळ Free Fire वर बंदी आल्यानंतर Free Fire MAX भारतीय खेळाडूंसाठी उपलब्ध राहिला आणि आज तो देशातील सर्वाधिक लोकप्रिय मोबाईल ई-स्पोर्ट्स गेमपैकी एक बनला (Free Fire Max)आहे.
या गेममध्ये ५० हून अधिक खेळाडू एका बेटावर उतरतात. सुरुवातीला कोणाकडेही शस्त्र नसते. खेळाडूंना शस्त्रे, दारुगोळा आणि इतर आवश्यक साहित्य गोळा करून रणनीतीच्या जोरावर शेवटपर्यंत जिवंत राहावे लागते. अखेरपर्यंत टिकून राहणारा खेळाडू किंवा संघ विजेता (Free Fire Max)ठरतो.
गेम इतका लोकप्रिय का?
Free Fire MAX मध्ये Battle Royale व्यतिरिक्त Clash Squad (४ विरुद्ध ४), Lone Wolf यांसारखे स्पर्धात्मक मोड, विविध पात्रांची विशेष कौशल्ये, Pets प्रणाली, Craftland द्वारे स्वतःचे नकाशे तयार करण्याची सुविधा आणि आकर्षक ग्राफिक्स यामुळे हा गेम तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. कमी वेळात संपणारे सामने, वेगवान गेमप्ले आणि संघभावनेवर भर ही त्याची मोठी वैशिष्ट्ये मानली(Free Fire Max) जातात.
आज Free Fire हा जगातील सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या मोबाईल गेम्सपैकी एक आहे. लॅटिन अमेरिका, दक्षिण-पूर्व आशिया आणि भारतात त्याचा मोठा चाहता वर्ग असून त्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा लाखो प्रेक्षक थेट(Free Fire Max) पाहतात.
भारताकडून मोठ्या अपेक्षा
यंदाच्या World Cup मध्ये भारताचा संघ जगातील बलाढ्य संघांविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारतीय खेळाडूंनी अलीकडच्या काळात सातत्यपूर्ण कामगिरी करत जागतिक स्तरावर आपली छाप पाडली आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतही भारतीय संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात(Free Fire Max) आहे.
पिंपरी-चिंचवडचा Shoto FF हा भारताच्या आशा घेऊन या स्पर्धेत उतरत असल्याने महाराष्ट्रातील गेमिंग चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक तरुणांसाठी त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरत असून, “आपल्या शहरातून जागतिक स्पर्धेपर्यंत” ही त्याची वाटचाल अनेकांसाठी आदर्श ठरत (Free Fire Max)आहे.
स्पर्धेचे वेळापत्रक
१३ जुलै : संघांचे आगमन
१४ जुलै : मीडिया डे आणि अधिकृत उपक्रम
१५ व १६ जुलै : गट फेरी
१७ जुलै : पुढील टप्प्यातील सामने
१८ जुलै : ग्रँड फायनल
भारताचा कोणत्या संघाविरुद्ध आणि कोणत्या वेळेला सामना होणार, याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होताच त्याची सविस्तर माहिती आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवणार (Free Fire Max)आहोत.
क्रिकेटमध्ये जसा एखादा स्थानिक खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतो आणि संपूर्ण शहर त्याच्या पाठीशी उभे राहते, तसाच क्षण आता पिंपरी-चिंचवडसाठी आला आहे. मानव उर्फ Shoto FF जागतिक रंगमंचावर भारतासाठी खेळणार असून त्याच्या प्रत्येक सामन्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्या (Free Fire Max)आहेत.

उद्यापासून ‘Road to World Cup – Shoto FF’ या विशेष मालिकेतून भारतीय संघ, Shoto FF चा प्रवास, सामन्यांचे विश्लेषण, गुणतालिका आणि प्रत्येक दिवसाचे सविस्तर वृत्त आम्ही आपल्या भेटीला घेऊन येणार (Free Fire Max)आहोत.
