(पिंपरी-चिंचवड, 7 सप्टेंबर 2026): पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली ‘धन्वंतरी गोल्ड’ वैद्यकीय योजना आता नगरसेवकांसाठीही लागू करण्यात आली आहे. महापौर रवी लांडगे यांच्या सूचनेनुसार महापालिकेने हा निर्णय घेतला असून, स्वीकृत सदस्यांसह एकूण १३८ नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार (Dhanvantari Gold Scheme)आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक नगरसेवकाच्या कुटुंबाला दरवर्षी २० लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची सुविधा मिळणार आहे. यासाठी नगरसेवकांच्या मानधनातून दरमहा १,५०० रुपये कपात करण्यात येणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ६० नामांकित रुग्णालयांमध्ये नगरसेवकांना कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये ५० मल्टिस्पेशालिटी आणि १० सिंगल स्पेशालिटी रुग्णालयांचा समावेश (Dhanvantari Gold Scheme)आहे.
योजनेत काही विशेष सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना किंवा लोकप्रतिनिधींना अपत्य नाही, त्यांना पहिल्या अपत्यासाठी आयव्हीएफ (IVF) उपचाराकरिता एक लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य दिले जाणार (Dhanvantari Gold Scheme)आहे.
मात्र, मद्यप्राशन किंवा व्यसनाधीनतेमुळे उद्भवलेल्या आजारांवरील उपचारांना या योजनेतून वैद्यकीय लाभ मिळणार नाही. डॉक्टरांच्या अहवालात आजाराचे कारण मद्यपान असल्याचे आढळल्यास संबंधित उपचाराचा संपूर्ण खर्च योजनेतून नाकारला जाणार (Dhanvantari Gold Scheme)आहे.
महापालिकेच्या सुमारे १० हजार ४९३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना यापूर्वीच ‘धन्वंतरी गोल्ड’ योजनेचे सुरक्षा कवच मिळत होते. आता नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही या योजनेत समावेश झाल्याने लोकप्रतिनिधींनाही वैद्यकीय उपचारांसाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध होणार (Dhanvantari Gold Scheme)आहे.
