वाकड, चिंचवड : आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, पोस्टल कॉलनी, वाकड यांच्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवार (दि. २८ जून २०२६) रोजी हॉटेल बर्ड व्हॅलीच्या भव्य सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सभेला सुमारे २३० ते २४० सभासदांसह विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित (Senior Citizens Wakad) होते.
कार्यक्रमाला माजी नगरसेविका स्वातीताई मयूर कलाटे आणि पिंपरी-चिंचवड शहर ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषालीताई मरळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. संघाचे अध्यक्ष भागवत कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कला मंचातील महिलांनी गणेशवंदना, शारदा स्तवन आणि स्वागतगीत सादर करून कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण (Senior Citizens Wakad) केले.
मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर स्वातीताई मयूर कलाटे यांनी संघाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचे कौतुक करत, महिलांचा मोठा सहभाग आणि सातत्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे संघाची वाटचाल प्रेरणादायी असल्याचे सांगितले. वृषालीताई मरळ यांनी संघासाठी स्वतंत्र विरंगुळा केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही (Senior Citizens Wakad)दिली.
यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या १३ ज्येष्ठ सभासदांचा सन्मान करण्यात आला. तसेच योग क्षेत्र, वैद्यकीय सेवा, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्ञानेश्वर गिरमे, रेखा गिरमे, माधव बराटे, डॉ. संतोष तेली, शिल्पा तेली आणि डॉ. नंदिनी तेली यांचाही विशेष गौरव करण्यात (Senior Citizens Wakad)आला.
संघाच्या यशस्वी वाटचालीत माजी नगरसेवक मयूर (पांडुरंग) कलाटे यांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत असल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. त्यानंतर वार्षिक सभेतील विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक ठराव मंजूर करण्यात(Senior Citizens Wakad) आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष मुरलीधर लहाने, सचिव सुरेश बोरकर, सहसचिव आप्पासाहेब तेली आणि खजिनदार माधव बराटे यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गिरमे यांनी केले. महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. कळमकर तसेच श्री. कुलकर्णी आणि श्री. देसाई यांचे मोलाचे सहकार्य (Senior Citizens Wakad)लाभले.
आभारप्रदर्शन, पसायदान आणि सर्व सभासदांसाठी आयोजित भोजनानंतर सभेची सांगता झाली. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे उपस्थितांनी या कार्यक्रमाला “आदर्श सभा” अशी उत्स्फूर्त दाद (Senior Citizens Wakad)दिली.
