(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण असला तरी उत्सव साजरा करताना पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांनीही स्वीकारावी. गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले (Dr.Vijay Suryawanshi) आहे.
गणेशमूर्तीची निवड करताना शाडू मातीच्या तसेच नैसर्गिक रंगांचा वापर केलेल्या मूर्तींना प्राधान्य द्यावे. जलप्रदूषण टाळण्यासाठी पीओपीच्या मूर्तींचा वापर टाळावा. मूर्तींचे विसर्जन नदी, नाला किंवा तलावात न करता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौद व जलकुंडांमध्येच करावे, असे प्रशासनाने आवाहन केले (Dr.Vijay Suryawanshi)आहे.
गणेशोत्सवादरम्यान निर्माण होणारे निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता महापालिकेच्या निर्माल्य संकलन केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे जमा करावे. तसेच ओला, सुका आणि विशेष काळजीचा कचरा स्वतंत्रपणे देण्याचे आवाहन करण्यात आले (Dr.Vijay Suryawanshi)आहे.
मंडप व घरगुती सजावटीसाठी प्लास्टिक आणि थर्माकोलऐवजी नैसर्गिक व पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करावा. विद्युत रोषणाईसाठी एलईडी दिव्यांचा वापर करून ऊर्जाबचतीला प्राधान्य द्यावे. ध्वनीविषयक नियमांचे पालन करून ध्वनी प्रदूषण टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट (Dr.Vijay Suryawanshi)केले.
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी महापालिकेच्या संकलन व कृत्रिम विसर्जन व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन(Dr.Vijay Suryawanshi) केले.
“श्रद्धा आणि उत्साहासोबत पर्यावरण संवर्धन, जलस्रोतांचे संरक्षण आणि शहराची स्वच्छता यांना प्राधान्य देत नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करावा. नागरिकांच्या सहभागातूनच स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत शहराचा संकल्प प्रत्यक्षात येईल,” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी(Dr.Vijay Suryawanshi) सांगितले.
