रावेत : पवना नदीच्या जाधव वस्ती विसर्जन घाट परिसरात काही व्यक्तींकडून ट्रॅक्टरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे कचरा टाकून परिसराचे विद्रूपीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना (शिंदे गट) प्रभाग क्रमांक १६ च्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधित प्रकाराची पाहणी (Jadhav Vasti Ghat ) केली.
शिवसेना (शिंदे गट) प्रभाग क्रमांक १६ च्या नेत्या ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या स्क्वाडला तात्काळ घटनास्थळी बोलावून संबंधित ट्रॅक्टरवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पर्यावरण विभागाने संबंधित वाहनावर कारवाई करत भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्याचा इशारा(Jadhav Vasti Ghat ) दिला.
पवना नदी परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी सांगितले. नदीकाठावर बेकायदेशीरपणे कचरा टाकल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट(Jadhav Vasti Ghat ) केले.
“पवना नदीचे संवर्धन, स्वच्छ परिसर आणि पर्यावरण संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भविष्यात कोणीही नदी परिसरात बेकायदेशीररित्या कचरा टाकण्याचे धाडस करू नये, यासाठी अशा कृत्यांविरोधात कठोर कारवाई सातत्याने सुरू राहील,” असे ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी (Jadhav Vasti Ghat )सांगितले.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनीही नदीकाठ स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आणि अशा प्रकारांची माहिती तात्काळ महानगरपालिका किंवा लोकप्रतिनिधींना देण्याचे आवाहन करण्यात आले (Jadhav Vasti Ghat )आहे.
