प्रतिनिधी :राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) कार्ड काढणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने याबाबत सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना आदेश जारी केले (ABHA Card) आहेत.
शिक्षण संचालनालयाच्या २२ एप्रिल २०२६ रोजीच्या पत्रानुसार, राज्यातील जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेतून प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण उपलब्ध करून देण्यात(ABHA Card) येते.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ABHA कार्ड काढणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, कार्ड नसल्यास वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके स्वीकारली जाणार नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने नोंदणी करून ABHA कार्ड तयार करण्याचे आवाहन करण्यात आले (ABHA Card)आहे.
ABHA म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट. हे १४ अंकी डिजिटल हेल्थ आयडी असून, नागरिकांच्या आरोग्यविषयक नोंदी सुरक्षित ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. हे कार्ड ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने मोफत तयार करता (ABHA Card)येते.
ऑनलाइन नोंदणीसाठी राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशनच्या ABHA पोर्टलवर जाऊन “Create ABHA Number” हा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सच्या मदतीने OTP पडताळणी करून ABHA अॅड्रेस तयार करता येतो. यशस्वी नोंदणीनंतर १४ अंकी ABHA कार्ड डाउनलोड करता(ABHA Card) येते.
ज्यांच्याकडे मोबाईल किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध नाहीत, त्यांनी जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन आधार कार्ड व ओळखपत्राच्या सहाय्याने ऑफलाइन नोंदणी करता येणार (ABHA Card)आहे.
शिक्षण उपसंचालक डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या आदेशामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये ABHA कार्ड नोंदणीला वेग येण्याची शक्यता (ABHA Card)आहे
