पिंपरी, दि. २४ एप्रिल २०२६ : “पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक असून त्यातूनच मानवी संस्कृती जिवंत राहते,” असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. जागतिक पुस्तकदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने निगडी प्राधिकरण येथील शांता शेळके सभागृहात आयोजित पुस्तकपूजन व कवयित्री हेमांगी बोंडे लिखित ‘मधुगंधित हेमाक्षरे : कवितांची मांदियाळी’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत (World Book Day) होते.
कार्यक्रमास ‘सरवा’कार प्रा. किसन वराडे, प्रा. संजय पवार, शाखाध्यक्ष राजन लाखे, शाखा उपाध्यक्षा प्रा. डॉ. रजनी शेठ, कवयित्री हेमांगी बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजन लाखे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदस्यांनी स्वलिखित व आवडत्या पुस्तकांचे पूजन (World Book Day)केले.
यावेळी अभय कुलकर्णी व ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांच्या हस्ते शहरातील ज्येष्ठ पुस्तक विक्रेते राजू कासट व सुनील टेपाळे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात (World Book Day)आला.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “आज जग युद्धाच्या छायेत आहे. अशा वेळी पुस्तकातून मिळणारे ज्ञान माणुसकी आणि संस्कृती वाचवू शकते. ‘मधुगंधित हेमाक्षरे’ या शीर्षकातून कवयित्री हेमांगी बोंडे यांचा आत्मविश्वास (World Book Day)जाणवतो.”
राजन लाखे यांनी लेखनप्रक्रियेत प्रज्ञा, प्रतिभा, प्रगल्भता आणि भाष्य यांचा समन्वय असल्याचे सांगत या काव्यसंग्रहातील कविता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. किसन वराडे यांनी कवयित्रीची प्रतिभा सर्वस्पर्शी असून समाजाभिमुख कविता संवेदनशीलता दर्शवितात, असे म्हटले. प्रा. संजय पवार यांनी जागतिक पुस्तकदिन हा पुस्तकांच्या प्रचार-प्रसारासाठी मोठी संधी असल्याचे (World Book Day)सांगितले.
कवयित्री हेमांगी बोंडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अध्यापन सेवेत असताना केलेल्या लेखनासोबत सेवानिवृत्तीनंतर करोना काळात ‘काव्यप्रेमी शिक्षक मंच’ समूहातून विविध काव्यप्रकार शिकून या संग्रहाची निर्मिती झाली. प्रार्थना, आरती, भारुड, लावणी, विडंबन, अलंकारयुक्त कविता, गीतप्रकार, मुक्तच्छंद, ओवी, अभंग, चाराक्षरी ते चौदाक्षरी अक्षरछंद, वृत्तबद्ध कविता, गझल, हझल, हायकू, दोहा तसेच मायबोली लेवा गणबोलीतील कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. हा संग्रह प्रत्येक माध्यमिक ग्रंथालयात असावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त(World Book Day) केली.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी विनिता श्रीखंडे, नीलिमा फाटक, कमल सोनजे, जयश्री श्रीखंडे, इला पवार, गीता सुतार, अनघा पाठक यांनी सहकार्य केले. किरण लाखे यांनी सूत्रसंचालन तर अशोक बोंडे यांनी आभार(World Book Day) मानले.
