पिंपरी-चिंचवड : प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे माऊली उद्यान येथे एप्रिल व मे महिन्यातील सदस्यांचे वाढदिवस तसेच हिंदी-मराठी भावगीत व भक्तीगीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात संघातील आठ गटांतील २१ सभासदांनी सहभाग (Senior Citizens) घेतला.
कार्यक्रमादरम्यान एप्रिल व मे महिन्यातील सदस्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. तसेच श्री. अतुल इनामदार यांच्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्थांना धनादेश स्वरूपात आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. संस्थांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करून संघाबद्दल कृतज्ञता व्यक्त (Senior Citizens)केली.
संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी गायक कलाकार व कार्यकारिणी सदस्यांचे कौतुक करत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले. भावगीत-भक्तीगीत उपक्रमाचे समन्वयक मनोहर जोशी, श्रीनिवास ठोंबरे, आशा नष्टे व वृषाली गुर्जर यांचाही विशेष गौरव करण्यात (Senior Citizens) आला.
पौर्णिमा कासार यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सादर केले. ज्योती कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रार्थना व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी (Senior Citizens) ठरला.
