पिंपरी : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये अतुल्या बाळासाहेब डोंगरे हिने 720 पैकी 670 गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत (AIR) 498 वा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत (NEET UG 2026)आहे.
अतुल्याने दहावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई (ICSE) बोर्डातून, तर अकरावी-बारावीचे शिक्षण सीबीएसई (CBSE) बोर्डातून पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत तिने 97.6 टक्के गुण मिळवले. लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे ध्येय निश्चित करून तिने NEET परीक्षेची तयारी नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने (NEET UG 2026)केली.
यशाचे श्रेय देताना अतुल्या म्हणाली, “नियमित वर्गांना उपस्थित राहणे, रोजचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करणे आणि कोणताही बॅकलॉग न ठेवणे, या सवयी मी कायम जोपासल्या. अभ्यासातील शंका तत्काळ शिक्षकांकडून दूर करून घेतल्या. जीवशास्त्रासाठी NCERT पुस्तकाचा सखोल अभ्यास केला, तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासाठी सातत्याने प्रश्नांचा सराव केला. पालक आणि शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे परीक्षेतील तणावावर मात करता (NEET UG 2026)आली.”
भविष्यात उत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून आवडीच्या विषयात विशेष प्राविण्य मिळवत भारतातच वैद्यकीय सेवेद्वारे समाजसेवा करण्याची इच्छा तिने व्यक्त(NEET UG 2026) केली.
अतुल्याचे वडील बाळासाहेब डोंगरे म्हणाले, “डॉक्टर होण्याचा निर्धार तिने बालपणापासूनच केला होता. तिच्या प्रत्येक निर्णयात आम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. तिच्या या यशाचा आम्हाला मनापासून अभिमान (NEET UG 2026)आहे.”
आई शर्मिला डोंगरे म्हणाल्या, “अतुल्या लहानपणापासून अभ्यासू, जिद्दी आणि मेहनती आहे. उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर ते पूर्ण केल्याशिवाय ती थांबत नाही. तिच्या अथक परिश्रमाचे आज सार्थक झाले आहे.”
NEET-UG 2026 मधील या यशामुळे अतुल्या डोंगरेने वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले असून तिच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत (NEET UG 2026)आहे.
