प्रतिनिधी :चाकण औद्योगिक वसाहतीतील बहुराष्ट्रीय Mercedes-Benz कंपनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावरणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. सोमवारी (११ मे २०२६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कंपनीच्या उत्पादन विभागात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या (Leopard Captured)अडकला.
गेल्या आठवड्यापासून चाकण परिसरातील सेनी हेवी इंडस्ट्रीज आणि मर्सिडीज बेंझ कंपनी परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली होती. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या वेळी कंपनीच्या उत्पादन विभागात बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या घटनेनंतर वनविभागाने तातडीने उत्पादन विभाग सील करून संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यास सुरुवात केली (Leopard Captured ) होती.
बिबट्या कंपनीच्या बाहेर गेलेला नसल्याची खात्री झाल्यानंतर वनविभागाने सर्व बाहेर जाणारे मार्ग बंद केले. खबरदारीचा उपाय म्हणून उत्पादन विभागात तब्बल नऊ पिंजरे लावण्यात आले होते. या पिंजऱ्यांमध्ये बिबट्याला आकर्षित करण्यासाठी भक्ष्य ठेवण्यात आले(Leopard Captured ) होते.
बिबट्या कंपनीच्या आतमध्येच लपून बसल्यामुळे मागील दोन दिवसांपासून मर्सिडीज बेंझची उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत गोपनीय आणि दक्षतेने राबविण्यात (Leopard Captured )आले.
अखेर पाणी आणि भक्ष्याच्या शोधात बाहेर पडलेल्या बिबट्याने शॉप फ्लोअर परिसरात ठेवलेल्या कोंबडीच्या पिंजऱ्यात प्रवेश केला आणि तो जेरबंद झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पकडण्यात आलेला बिबट्या अंदाजे दीड ते दोन वर्षांचा (Leopard Captured )आहे.
या मोहिमेदरम्यान चाकण वनविभागाचे अधिकारी, रेस्क्यू टीम तसेच Manikdoh Leopard Rescue Centre चे पथक कंपनी परिसरात तळ ठोकून होते. पकडलेल्या बिबट्याला सुखरूपपणे पुनर्वसन केंद्रात हलविण्यात आले (Leopard Captured )आहे.
विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांत मर्सिडीज बेंझ कंपनी परिसरात बिबट्या जेरबंद होण्याची ही दुसरी घटना आहे. दरम्यान, बिबट्या पकडण्यात यश आल्यानंतर कंपनीची उत्पादन प्रक्रिया पुन्हा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती समोर आली (Leopard Captured )आहे.
