(वाकड, दि. ३ सप्टेंबर ): आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, पोस्टल कॉलनी, वाकड यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मौज, मजा, मस्ती आणि निसर्गाच्या सानिध्यात एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले. भूगाव-पौड रोड येथील ‘निसर्ग छाया फाउंडेशन’ येथे ही सहल उत्साहात पार(Senior Citizens Association) पडली.
पुण्याजवळील निसर्गरम्य परिसरात वसलेली ‘निसर्ग छाया फाउंडेशन’ची भव्य वास्तू ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. महाराष्ट्र राज्याचे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून या फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली असून, व्यवस्थापक म्हणून मंदार देगावकर आणि अमृता देगावकर काम पाहत (Senior Citizens Association)आहेत.
या सहलीत १९ पुरुष आणि २५ महिला असे एकूण ४४ ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. फाउंडेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर निसर्गरम्य वातावरण आणि प्रसन्न परिसरामुळे सर्वांचा प्रवासाचा थकवा दूर झाला. सहभागींसाठी नाश्ता, चहा तसेच जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली(Senior Citizens Association) होती.
दिवसभर विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. संगीत खुर्ची, नृत्य, गाणी, रिंग, फुगे, डंबेल आदी खेळांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या खेळांमध्ये सहभागी होताना प्रत्येक जण बालपणीच्या आठवणींमध्ये रमल्याचे चित्र पाहायला मिळाले. वयाचे भान विसरून सर्वांनी मनमुराद आनंद (Senior Citizens Association)घेतला.
दिवसभर धमाल, मस्ती आणि आनंद लुटल्यानंतर सायंकाळी सर्व ज्येष्ठ नागरिक समाधानाने परतीच्या प्रवासाला रवाना झाले.सहलीचे संयोजन संघाचे अध्यक्ष भागवत कोल्हे, उपाध्यक्ष मुरलीधर लहाने, सचिव सुरेश बोरकर आणि खजिनदार माधव बरहाटे यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार बाबू डिसोजा यांनी वृत्ताचा आढावा(Senior Citizens Association) घेतला.
