पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील १५० पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून, त्यापैकी १२ पोलीस निरीक्षकांची विविध पोलीस घटकांतून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली झाली आहे. तर आयुक्तालयातील दोन निरीक्षकांची अन्य घटकांमध्ये बदली करण्यात आली (PCMC Police Transfer)आहे.
१२ नव्या निरीक्षकांची आयुक्तालयात नियुक्ती
पिंपरी-चिंचवडमध्ये बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांमध्ये प्रशांत आरदवाड, हेमंत कदम, रवींद्र कदम, सिद्धराम म्हेत्रे, विजयकुमार शिंदे, देवेंद्र चव्हाण, सुरेखा घार्गे, चंद्रकांत जाधव, राजेंद्र निकाळजे, गोताराम शेवाळे, सोमनाथ जाधव आणि अमोल गवळी यांचा समावेश(PCMC Police Transfer) आहे.
या अधिकाऱ्यांच्या मुंबई, धाराशिव, पुणे शहर, गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस प्रशिक्षण केंद्र तसेच अन्य पोलीस घटकांतून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदल्या करण्यात आल्या (PCMC Police Transfer)आहेत.
दोन निरीक्षकांची अन्यत्र बदली
आयुक्तालयातील पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांची रायगड येथे, तर शत्रुघ्न माळी यांची नवी मुंबई येथे बदली करण्यात आली(PCMC Police Transfer) आहे .
सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गतही सहा पोलीस निरीक्षकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.
संतोष पाटील — तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे ते गुन्हे शाखा
अर्जुन घोडे पाटील — निगडी पोलीस ठाणे ते गुन्हे शाखा
विजयानंद पाटील — पिंपरी पोलीस ठाणे ते तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे
नरेंद्र ठाकरे — नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा
प्रदीप पाटील — नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा
तेजस्विनी कदम — गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा
या फेरबदलामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील विविध विभागांच्या कामकाजात बदल होणार आहेत. नव्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने आगामी काळात काय परिणाम दिसून येतात, याकडे लक्ष लागले(PCMC Police Transfer) आहे.
