(पिंपरी, विवेक कुलकर्णी ): ‘ती आली, तिने पाहिले आणि तिने जिंकले’ असेच काहीसे चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळाले. सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी आपल्या सुरेल आवाजाने तर रसिकांची मनं जिंकलीच; पण त्याहीपेक्षा आपल्या शालीन, सुसंस्कृत आणि विनम्र वागणुकीने त्यांनी उपस्थित प्रत्येकाच्या मनात वेगळे स्थान निर्माण (Shreya Ghoshal) केले.
व्यासपीठावर प्रवेश करताना श्रेया घोषाल यांनी सर्वप्रथम प्रेक्षकांकडे वळून नम्रपणे अभिवादन केले. त्यानंतर व्यासपीठावर विराजमान असलेल्या आशाताई भोसले यांच्या प्रतिमेसमोर जाऊन त्यांनी अत्यंत आदराने नमस्कार केला. त्यांच्या या सहज आणि मनापासून केलेल्या कृतीने सभागृहातील रसिक भारावून गेले. चाहत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या विनम्रतेचे कौतुक (Shreya Ghoshal)केले.
इतकी मोठी आणि जगप्रसिद्ध गायिका असूनही श्रेया घोषाल यांच्यातील साधेपणा संपूर्ण कार्यक्रमात प्रकर्षाने जाणवत होता. त्या केवळ मंचावरच्या ‘स्टार’ राहिल्या नाहीत, तर अगदी सामान्य रसिकांमध्ये मिसळून त्यांच्या आनंदाचा भाग बनल्या. चाहत्यांच्या फर्माइशी त्या आनंदाने पूर्ण करत होत्या. त्यामुळे सभागृहातील उत्साह क्षणाक्षणाला वाढत(Shreya Ghoshal) गेला.
श्रेया घोषाल यांच्या आवाजातील गोडवा रसिकांनी अनेकदा अनुभवला आहे; मात्र या कार्यक्रमात त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गोडवाही तितकाच भावला. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही साधेपणा आणि संस्कार जपणारी कलाकार म्हणून त्यांची प्रतिमा या कार्यक्रमातून अधिकच ठळक (Shreya Ghoshal)झाली.
‘भाऊसाहेब’ म्हणताच नात्याला मिळाली भावनेची किनार
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संयोजक भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रभावी प्रस्तावना करताना संस्थेचे धोरण आणि गेल्या २० वर्षांचा प्रवास रसिकांसमोर मांडला. श्रेया घोषाल यांच्याशी आपले ‘भाऊसाहेब’ हे केवळ नावाचे नव्हे, तर भावाचे नाते असल्याचे सांगत त्यांनी श्रेयाला ‘भारताचे हृदय’ आणि ‘छोटी दीदी’ अशा आपुलकीच्या शब्दांत (Shreya Ghoshal)संबोधले.

लता मंगेशकर यांनाही ‘दीदी’ म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करण्यासाठी आणल्याची आठवण सांगत भोईर यांनी श्रेया घोषाल यांनीही पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लाईव्ह कॉन्सर्ट करावा, अशी प्रेमळ मागणी(Shreya Ghoshal) केली.
या प्रेमळ आवाहनाला श्रेया यांनीही तितक्याच आपुलकीने प्रतिसाद दिला. “तुमच्या या प्रेमाने मी भारावून गेले आहे. मी नक्कीच लवकरच येथे पुन्हा येईन,” असे आश्वासन त्यांनी देताच सभागृहात एकच जल्लोष झाला. टाळ्यांचा कडकडाट आणि चाहत्यांचा उत्साह बराच वेळ थांबण्याचे नाव घेत (Shreya Ghoshal)नव्हता.
भाषणापेक्षा जुगलबंदीनेच रंगत वाढवली!
श्रेया घोषाल यांच्या कौतुकात व्यासपीठावरील राजकीय नेत्यांमध्ये रंगलेली गमतीशीर जुगलबंदीही या सोहळ्याचे खास आकर्षण(Shreya Ghoshal) ठरली.
भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या भाषणात “माझे अनेक चाहते आणि कार्यकर्ते मला सांस्कृतिक मंत्री म्हणून संबोधतात,” असे मिश्कीलपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, “भाऊसाहेब आमदार किंवा सांस्कृतिक मंत्री व्हायला हवेत,” असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट (Shreya Ghoshal)झाला.
पण त्यानंतर आमदार अमित गोरखे यांनी या विनोदाला आणखी एक राजकीय ट्विस्ट दिला. मुख्यमंत्री देवेंद्रजींचा संदर्भ देत त्यांनी, “अजूनही वेळ आहे. आमच्या पक्षात या आणि हे स्वप्न पूर्ण करा,” अशी थेट खुली ऑफरच भाऊसाहेब भोईर यांना दिली. हे ऐकताच संपूर्ण प्रेक्षागृह हास्याच्या लाटेत(Shreya Ghoshal) बुडाले.
आमदार गोरखे आपले भाषण पूर्ण करून खुर्चीकडे जात असतानाच भाऊसाहेब भोईर यांनी दोन्ही हात जोडत त्यांना अक्षरशः मनापासून ‘कोपरापासून हात’ जोडला. भोईर यांच्या या मिश्कील प्रत्युत्तराने पुन्हा एकदा हास्याचा स्फोट झाला आणि वातावरण आणखी हलकेफुलके (Shreya Ghoshal)झाले.
सुरेल संध्याकाळी आठवणींची कायमची मैफल
एकीकडे श्रेया घोषाल यांच्या आवाजाची जादू, दुसरीकडे त्यांच्या साधेपणाने जिंकलेली मने आणि त्यात व्यासपीठावर रंगलेली मिश्कील जुगलबंदी—या सर्वामुळे पिंपरी-चिंचवडमधील हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम न राहता रसिकांच्या स्मरणात राहणारी एक सुंदर सांस्कृतिक आठवण(Shreya Ghoshal) ठरला.

आशाताई भोसले यांच्या नावाचा मानाचा पुरस्कार स्वीकारताना श्रेया घोषाल यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता, व्यासपीठावर आशाताईंच्या प्रतिमेला केलेला नमस्कार आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या प्रेमाला दिलेले पुन्हा येण्याचे आश्वासन—या भावनिक क्षणांसोबतच त्यांच्या सहज, विनोदी आणि आपुलकीच्या वागण्याने त्या संध्याकाळी रसिकांच्या मनावर अक्षरशः ‘श्रेया’ (Shreya Ghoshal)उमटवली.

