(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आज प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुका पार पडल्या. प्रत्येक प्रभागातून केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सर्व १० प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड (Ward Committee Chairman )झाली.
विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (भा.प्र.से.) प्रजित नायर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून निवडणूक प्रक्रिया पार पाडली. नगरसचिव उल्हास जगताप, मुकेश कोळप, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच संबंधित प्रभाग अधिकारी आणि नगरसचिव विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी (Ward Committee Chairman )केले.

पीठासीन अधिकारी प्रजित नायर यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार, ‘अ’ राजगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी अर्चना करांडे, ‘ब’ सिंहगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी मंदार देशपांडे, ‘क’ विजयदुर्ग प्रभाग समितीच्या सभापतीपदी निखिल बोऱ्हाडे, ‘ड’ देवगिरी प्रभाग समितीच्या सभापतीपदी सविता खुळे, ‘इ’ शिवनेरी प्रभाग समितीच्या सभापतीपदी अर्चना सस्ते, ‘फ’ तोरणा प्रभाग समितीच्या सभापतीपदी शिवानी नरळे, ‘ग’ पुरंदर प्रभाग समितीच्या सभापतीपदी मनिषा पवार, ‘ह’ प्रतापगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी तृप्ती कांबळे, ‘ज’ रायगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी आरती चोंधे आणि ‘ल’ लोहगड प्रभाग समितीच्या सभापतीपदी रेखा देवकर यांची अधिकृत घोषणा करण्यात (Ward Committee Chairman )आली.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्याने निवडून आलेल्या सर्व प्रभाग समिती सभापतींनी महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, पदाधिकारी आणि नगरसदस्यांची भेट घेऊन शुभेच्छा (Ward Committee Chairman )स्वीकारल्या.

